स्व.मुंडेंना शंभर टक्के मतदान करणार्‍या आंधळेवाडीत धनंजय मुंडेंचे जंगी स्वागत

0
1373
Google search engine
Google search engine

आष्टी दि.19.स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करणार्‍या आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

आंधळेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांनी भेट दिली असता, गावात त्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. ज्या गावाने कधी काळी नाकाबंदी केली होती. त्याच गावात आज फुले देऊन स्वागत केले. हवा बदल रही है असे म्हणत देवांनाही वनवास भोगावा लागला तिथे मी सामान्य माणुस आहे. आज हा वनवास संपला असून, जनतेने स्वीकारल्या बद्दल गावकर्‍यांचे आभार मानत त्यांनी गावाच्या विकासासाठी कटीबध्द राहु अशी ग्वाही दिली. यावेळी विठ्ठल महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी त्यांच्या समवेत बाळासाहेब अजबे काका, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे, विठ्ठल सानप, शिवाजी नाकाडे आदी उपस्थित होते.