चांदुर बाजार तालुक्यात वाळू तस्करी ला मोठ्या प्रमाणात उधाण, वाळू घाट मधून क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा उपसा, महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष,शिरजगाव कसबा मंडळ वाळू तस्करी मध्ये आघाडीवर आहे.

0
960

चांदुर बाजार तालुक्यात वाळू तस्करी ला मोठ्या प्रमाणात उधाण,
वाळू घाट मधून क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा उपसा,
महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष,शिरजगाव कसबा मंडळ वाळू तस्करी मध्ये आघाडीवर आहे.

चांदुर बाजार:-प्रतिनिधी

तहसीलदार शिल्पा बोबडे यांची बदली झाल्यानंतर चांदुर बाजार तालुक्यातून वाळू माफियांना मोकळे रान झाले आहे.त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मागील आठ दिवसात वाळू तस्करी चा जोर वाढून आला आहे.हे वाळू तस्कर खुलेआम ट्रकतर द्वारे तस्करी च्या वाळूची वाहतूक करीत आहे.

या चोरट्या वाळू व्यवसाय कडे स्थानिक महसूल विभाग हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील महसूल विभागाच्या 6 ही मंडळ मधून नियोजन बद्ध पद्धतीने वाळू ची तस्करी सुरू आहे.या मध्ये शिरजगाव कसबा महसूल मंडळ आणि आसेगाव महसूल मंडळ हे वाळू तस्करी अग्रेसर आहे. त्यामुळे या वाळू माफिया तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी चागल्या प्रकारे वळणावर आणले होते. आता त्यांच्या वर कोणाचा अंकुश नसल्याचे दिसत आहे.रेती ज्या वाहनातून वाहतूक होते त्या ट्रकटर ला असलेल्या ट्रॉली वर क्रमांक सुद्धा नसतात मग त्यांच्यावर कार्यवाही का नाही? हाही प्रश्न आहे.

नवीन वाळू घाट हऱ्यास होण्याला फार थोडा काळ शिल्लक असल्याने वाळू तस्करने यापूर्वी च त्या ठिकाणी असलेला वाळूचा साठा नदीपात्राच्या वर अवैध रित्या करून ठेवला आहे.त्यामुळे वाळू घाट पूर्णपणे रिकामी करण्याचा या वाळू तस्कर चा उद्देश दिसत आहे.या बाबी कडे महसूल विभाग कश्या पद्धतीने आळा घालतील असा ही प्रश्न निमार्ण झाला आहे.

तालुक्यात होत असलेल्या वाळू तस्करी कडे महसूल विभागाच्या हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे होणाऱ्या वाळू तस्करी वरून स्पस्ट होते.अश्यातच शिरजगाव कसबा आणि आसेगाव या दोन मंडळ मधून मोठ्या प्रमाणात होणारी वाळू तस्करी पाहात या परिसराचे मंडळ अधिकारी,तलाठी कोतवाल,यांच्या कडे वाळू तस्करी च्या प्रकरणात संशय च्या दृष्टीने पहले जात आहे.अश्यातच तालुका तहसिलदार पद हे प्रभारी असल्यामुळे वाळू तस्कर याना तस्करी चे उधाण आले आहे.या वाळू तस्करी ला कार्यवाही करून त्वरित पायबंद घालणे अत्यावश्यक झाले आहे.महसूल विभाग या तस्कर वर कोणती कार्यवाही करणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.