अखेर त्या शिक्षकावर आणि त्याच्या सहकारी बलात्काराचा गुन्हा दाखल; दोघांची जेल मध्ये रवानगी

253

अखेर त्या शिक्षकावर आणि त्याच्या सहकारी बलात्काराचा गुन्हा दाखल; दोघांची जेल मध्ये रवानगी
चांदुर बाजार -बादल डकरे
संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारी स्थानिक दौ सी काळे विद्यालयातील घटनेनी अखेर त्या शिक्षकावर आणि त्याच्या सहकारी मित्रावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
17 सप्टेंबर रोजी दौ सी काळे विद्यालयाचे शिक्षक संदेश काजलकर यांनी शाळेतील वर्ग 9 मधील विद्यार्थिनीला आपल्या मित्र सनी वानखडे यांच्या घरी बोलवून विनयभंग केला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करीत चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला होता. न्यायालयालायने सूनविलेल्या 3 दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर आज आरोपी संदेश काजलकर याना न्यायालयात पुन्हा सादर केले. या मध्ये सदर विद्यार्थीनि ने दिलेल्या पुरवणी बयांनानुसार व वैद्यकीय अहवालाचा आधारावर भा द वि 376 अंतर्गत बलात्काराच्या आरोपी शिक्षक आणि त्याच्या मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आधी त्याच्या सहकारी सनी वानखडे याला दिनांक 20 लाच न्यायालयीन कोठडी सुनावली.तसेच आज आरोपी शिक्षक याला अचलपूर येथील न्यायालयात हजर केले असतात त्याला सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सदर घटनेमुळे शिक्षक व विद्यार्थिनी यांचा पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या या घटनेला पोलिसांचा या निस्पक्ष कार्यवाहिने खरे रहस्य उघड झाले आहे.
सदर प्रकरण चा तपास अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे हे करीत आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।