भूमी फाऊंडेशनची निर्माल्य संकलन मोहीम – पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी तरुणाईचा पुढाकार

0
753

अकोट/संतोष विणके –
दरवर्षीप्रमाणे भूमी फाऊंडेशन उद्या दि.21 ला अकोट शहरात निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे.भुमीच्या या मोहीमेत निर्माल्य गोळा करुन त्याचे योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येईल. गणपती विसर्जना सोबत जलाशयात न टाकता ते भूमी च्या मोहीमेत द्यावे असे आवाहन भुमी फाऊंडेशन ने केले आहे. दि.22 सप्टेंबर रोजी भूमीचा निर्माल्य संकलन रथ आपल्यापर्यंत येईल. धार्मिक आराधना मोठ्या भक्ती भावाने आपण करीत असतो. दहा दिवस बाप्पाचे पावित्र्य आपण राखत असतो हेच पावित्र्य कायम राखण्यासाठी तथा जलाशयांच्या शुद्धतेसाठी भूमी फाऊंडेशन व आपण सर्व मिळुन निर्माल्य संकलन मोहीमेस आपन हातभार लावावा.सर्व गणेश भक्तांना भुमीचे आवाहन व विनंती आहे की यंदा आपल्याकडे पावसाळा सपंत आला आहे.पण भरपूर पाऊसच आला नाही.सर्व जलाशयं!विहरी,नदी,नाले,तलाव कोरडी पडली आहेत सर्व गणेश मंडळानी व घरगुती गणपती बसवणार्यांनी आपल्या कडील निर्माल्य आमच्या कडे द्यावे. जेणेकरुन विसर्जना नंतर ही आपण १० दिवस केलेल्या पुजेचे पावित्र्य कायम राहील.परीसरातील कोणत्याही जलाशयात पाणी निर्माल्यामुळं प्रदुषीत होणार नाही. निर्माल्य पाण्यात बुडणार नाहीत व त्यामुळं पिण्याच्या पाण्याचे साठे स्वच्छ राहतील तसेच निर्माल्याचे पाविञ ही राखले जाईल.तसेच या पवित्र दिवसात निर्माल्य (फुलांचे हार,दुर्वा ई.)हे सर्व कोणत्याही जलाशयात व घरा बाहेर न टाकता त्यांचे पण पावित्र्य कायम ठेवूया. गणपती विसर्जना सोबत जलाशयात न टाकता ते भूमीकडे द्यावे फाऊंडेशन कार्यालयात घेवुन यावे किंवा गुरुवार दि.22 सप्टेंबर रोजी भूमीचा निर्माल्य संकलन रथ आपल्यापर्यंत येईल.