आदीवासीबहुल कोहा गावातील तरुणांनी घेतला स्वच्छतेचा मंत्र

0
882

कोहा/प्रतीनीधी : अकोट तालुक्यातील कोहा या छोट्याश्या गावामधील काही तरुणांनी अस्वच्छतेला कंटाळून गाव स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला आणि कामाला लागले. गावातील युवक हे सकाळी रोज संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करतात आजचा युवक हा समाजातील जबाबदार नागरिक आहे असे मानत हे युवक कार्य करतात.

आपल्या देशाचेे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच स्वप्न पूर्ण देश स्वच्छ करण्याचा स्वप्न आहे आणि त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन या तरुणांनी संकल्प घेतला आहे. स्वच्छतेमुळे रोगराई ला आळा बसत असुन गाव सुंदर बनविण्याचे युवकांचे स्वप्न आहे.या गाव स्वच्छ मोहीमेत राजू मालवे,अविनाश शनवारे, संजय शेळके,राजेश हेकडे, चेतन वाघमारे,नामदेव येवले,कुणाल उईके,संजय येवले.यांच्यासह गावातील युवक झटत आहेत.