पनोरीच्या जिर्ण, शिकस्त झालेल्या धोकादायक जि. प.शाळेत विद्यार्थी घेत आहेत शिक्षण

0
833
Google search engine
Google search engine

तरोडा/प्रतीनीधी – अकोट पंचायत समीती अर्तगत येत असलेल्या ग्राम पनोरी येथील जिल्हा परीषद शाळा जणु विद्यार्थांच्या जीवावर ऊठली आहे असे दिसुन येत आहे पनोरीच्या या जिर्ण, शिकस्त अन धोकादायक झालेल्या जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण हे एखाद्या अपघातालाच आमंत्रण ठरेल की काय एवढी भयानक परीस्थीती आहे.पनोरी येथील शाळेत एक ते चौथी पर्यत वर्ग आहेत दोन खोल्या व एक रूम आहे शाळेची पंटसख्या २६ आहे मात्र
गेल्या कीत्येक वर्षापासुन शाळेची ईमारत एवढी शिकस्त व जीर्ण झाली आहे मुलांना शाळेत बसने कठीन झाले आहे शाळेच्या हेडमास्तरानी यांनी पंचायत समीतीचे ऊंबरठेही झिजवले पण याची दखल घेतली नाही किंवा कुठल्याच लोक प्रतिनीधी शाळेला भेट दिली नाही.

शाळा शिकस्त असल्या मुळे बर्याच पालंकानी आपल्या मुंलाना खासगि शाळेत पाठवले आहे त्या मुळे शाळेच्या पंटसखेत कमालीची घट झाली आहे शाळेच्या एका खोलीवर ची कवेलु हे माकडानी पुर्ण पणे फोडली आहेत जरासे पानी आले तरी विद्यार्थाना सुटी देण्याची परीस्थीती ओढावते. शाळेच्या तळभागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत शाळेच्या भितींला सुध्दा मोठ्या प्रमाणात तडा गेल्या आहेत शाळेत आत मधे जीथे चिमुकले मुले बसतात त्या ठिकाण ची फरसी ऊखडली आहे सध्यां पावसाळ्याचे दिवस आहेत .
चिमुकंल्याच्या जीवाला धोका निर्मान होत आहे २०१८ चालू सत्रांमधे शिक्षकांच्या बदल्या झाल्या कारणा मुळे शाळेच्या कामकाजात मोठी दिरगांई होत आहे असे या ठीकानी दिसुन येत जर अशीच शाळा जर राहीली तर एक दिवस गावातील नागरीक व पालक वर्ग शाळेला कुलुप ठोकल्या शीवाय राहनार नाहीत व शाळेच्या पंटसखेत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे या गंभीर बाबीकडे वरीष्ट अधिकांर्यानी या कडे लक्ष देण्याची गरज भासत आहे असे पालकांमधे बोलले जात आहे

आम्ही बरेच वेळा पंचायत समीतीला निवेदन दिले आहे कोणत्याच अधिकार्यानी याची दखल घेतली नाही ,,,
सौ. रूपाली दयाल मातुर्कर
शाळा समीती अध्यक्ष (पनोरी)

जर शाळेची ईमारत असीच राहिली तर नाईलाजाने आम्हाला आमच्या मुलांना खासगी शाळेत टाकावे लागनार आहे,,,,
जगदिश बरदिया पालक (पनोरी)