मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये हत्या

168
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये हत्या
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये हत्या

काठमांडू (नेपाळ) – मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची २० सप्टेंबरच्या रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर परिसरात हत्या करण्यात आली.

२ दुचाकींवरून आलेल्या ४ जणांनी खुर्शीद आलम यांच्यावर गोळीबार केला. दुचाकींचे क्रमांक भारतीय असल्याची माहिती असून हत्येनंतर आरोपी भारतात पळाल्याचे सांगण्यात येत आहे. या आक्रमणात एक पोलीस हवालदारही घायाळ झाला. त्याने या आक्रमणकर्त्यांना भारत-नेपाळ सीमेवर रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. खुर्शीद आलम आयएस्आयसाठी काम करायचा.