आईचा गर्भ

0
1031
Google search engine
Google search engine

नाशिक (प्रतिनिधी)

किती तो मंद प्रकाश तूझ्या गर्भामध्ये होता.
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.
एकटाच मी अन माझं जग तुच होतीस.

तिनं मला हे संपूर्ण जग दाखवल
तूझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.

तुला मला जोड़नारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.
तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.
माझ्या कानात फक्त़ तुझ्या आवाज ऐकू येत होता.

तू स्वतःला किती जपायचीस.
मी जगावं म्हणून दररोज तू किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच होता तुझा ध्यास.

गर्भातले ते महीने आणि त्या आठवणी पुन्हा येणार नाहीत.पण मी अजूनही तुझ्या शिवाय जगू शकणार नाही.

शब्दांकन :- यामिनी लोहार

संकलन :- उत्तम गिते, नाशिक