मूर्तीशास्त्राप्रमाणे बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करणे, हेच धर्मसंमत ! – सनातन संस्था

0
832
मूर्तीशास्त्राप्रमाणे बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती  वहात्या पाण्यात विसर्जित करणे, हेच धर्मसंमत ! – सनातन संस्था
मूर्तीशास्त्राप्रमाणे बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करणे, हेच धर्मसंमत ! – सनातन संस्था
Google search engine
Google search engine

 

काही तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी नदीप्रदूषणाच्या नावाखाली अमोनियम बायकार्बोनेट मिसळलेल्या कृत्रिम हौदांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देतात आणि प्रशासनही त्यानुसार कृती करतेमुळातच असे करणे धर्मशास्त्रविरोधी आहेधर्मशास्त्रांत श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली असावीतसेच तिचे आणि निर्माल्याचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे’, असे पूजासमुच्चय’ आणि मुद्गलपुराण’ या ग्रंथात म्हटले आहेवहात्या पाण्यात विसर्जन केल्याने मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पसरून त्याचा लाभ गणेशभक्तांना होतो आणि पूजकालाही आध्यात्मिक लाभ होतोहिंदु धर्मशास्त्रांत सांगितलेले सर्व सणउत्सव हे पर्यावरणपूरकच आहेतसध्याचे उत्सवांचे पालटलेले स्वरूप मूळ धर्मशास्त्रीय स्वरूपाकडे नेल्यास धर्माचरण होऊन पर्यावरण रक्षणही होईलअसे असतांना कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा अट्टाहास का गणेशमूर्ती विसर्जनासाठी असे अशास्त्रीय पर्याय देण्यापेक्षा शाडू माती आणि नैसर्गिक रंग यांविषयी प्रबोधन हेच पर्यावरणपूरक अन् धर्मशास्त्र सुसंगत होईलयाचसाठी सनातन संस्था गेली अनेक वर्षे प्रबोधन करत आहे,असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौनयना भगत यांनी केले आहे.

    वर्षभरात शहरातील अब्जावधी लिटर अतिदूषित सांडपाणी नदीनाल्यांत सोडले जात असतांना त्याविषयी निष्क्र्रिय असणार्‍या महानगरपालिकातथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी गणेशोत्सव आल्यावर मात्र प्रदूषण रोखण्यासाठी सक्रिय होतात.गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण असे विचित्र समीकरण मांडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हितसंबंधांतून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहेया हौदांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे आवाहन केले जातेप्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून महापालिका नंतर त्या घनकचरा विभागाच्या गाडीतून नेऊन पुन्हा नदीच्या पात्रातच फेकत असल्याचे पुण्यातील विविध प्रसिद्धीमाध्यमांनी छायाचित्रासह उघड केले आहेसध्या प्रशासन चालवत असलेल्या अशास्त्रीय मूर्ती विसर्जन करण्याच्या भूमिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेतप्रत्यक्षात पर्यावरणाची हानी ज्या गोष्टींमुळे होतेत्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहेनदी स्वच्छतेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही नदीची स्वच्छता केली जात नाहीतसेच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या दिवशी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात येतेपण प्रशासन त्यावर कृती करत नाहीत्यामुळे नदीमध्ये पाणी साडून धर्मशास्त्राचे आचरण्यास अनुकूलता निर्माण करण्यासाठी जनतेने प्रशासनावर दबाव आणायला हवा.

      वैध मार्गाने धर्मशास्त्र सांगणार्‍या सनातन संस्थेची मीडिया ट्रायल’ करण्याचा प्रयत्न निषेधार्ह !

    सनातन संस्था राबवत असलेल्या मोहिमेमध्ये सनातनचे साधक नम्रपणे धर्मशास्त्र सांगून भाविकांचे प्रबोधन करत असतात.साधक निर्माल्य गोळा करून ते नदीमध्ये विसर्जन करण्यासारखी कोणतीही मोहीम राबवत नाहीतअसे असतांना प्रसिद्धीमाध्यमेसनातनचे साधक नदीमध्ये विसर्जित करण्यास दबाव आणतातधमकावतात’, ‘सनातनचे साधक निर्माल्य गोळा करून वहात्या पाण्यात विसर्जन करतात’, अशा खोट्या बातम्या दाखवून सनातनची मानहानी करण्याचा प्रयत्न केला जात आहेअशाप्रकारे चुकीच्या बातम्या दाखवून मीडिया ट्रायल’ घेणे निषेधार्ह आहे.