वीर शिवाजी गणेशोत्सव मंडळाची रक्तदान करून गणेश वंदना

0
801
वीर शिवाजी गणेशोत्सव मंडळाची रक्तदान करून गणेश वंदना
वीर शिवाजी गणेशोत्सव मंडळाची रक्तदान करून गणेश वंदना
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके

हिवरखेड मार्गावरील अग्रसेन चौकातील वीर शिवाजी गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिनांक 20 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सामाजिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाच्या 39 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून अनोखी गणेश आराधना केली.विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवात नियमित रक्तदान करत आहेत . मंडळाचे यंदा पाचवे वर्ष असून वीर शिवाजी मंडळ हे भव्य दिव्य गणेश मूर्तीसह सजावटीसाठी प्रसिद्ध आहे.

रक्तदान शिबिरासाठी ठाकरे मेमोरियल ब्लड बँक अकोला येथील चमु रक्तसंकलना साठी उपस्थित होती.मंडळाचे अध्यक्ष धनराज गावंडे, उपाध्यक्ष शशांक कासवे, सचिव अक्षय घायल ,कोषाध्यक्ष अक्षय गावंडे, यांच्यासह शुभम देशपांडे ,तेजस लेंगे, विशाल भगत, अजय शर्मा, सुरज वर्मा, हर्षल मंगळे ,पवन शर्मा,विक्की सोनोने आदींनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता.मंडळाच्या याकार्यांच नागरीकांनी उत्स्फुर्त स्वागत केले.