अकोट ग्रामीण पोलिसांची दोन डी.जे .वाहनांवर कारवाई

0
1160
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी

अकोट ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित डीजे वर कारवाई करून डीजे ची दोन वाहने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा केली आहेत. अकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक 22 ला ग्रामीण पोलिसांना प्रतिबंधित दोन डीजे नजरेस पडली पोलिसांनी लगेच खातरजमा करून सदर दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला लावून कारवाई करण्यास सुरुवात केली व वृत्त लिहेस्तोवर पुढील प्रक्रिया सुरू होती. आकोट ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईने प्रतिबंधित डीजे लावणार्‍यांवर कारवाई होईल असे दिसत असल्याने डीजे लावणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.विसर्जन मिरवणुकी आधीच डीजेंवर कारवाई होत असल्यांनी पारंपारीक वाद्यच वापरावयाची चर्चा सुज्ञ गणेशभक्तांमध्ये होतांना दिसुन येत आहे.