काजळी येथून 60 लिटर गावठी दारू जप्त,आरोपी फरार पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या टीम ची कार्यवाही

155
काजळी येथून 60 लिटर गावठी दारू जप्त,आरोपी फरार पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या टीम ची कार्यवाही
काजळी येथून 60 लिटर गावठी दारू जप्त,आरोपी फरार पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या टीम ची कार्यवाही

काजळी येथून 60 लिटर गावठी दारू जप्त,आरोपी फरार
पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या टीम ची कार्यवाही

चांदुर बाजार:-प्रतिनिधी

मोठ्या प्रमाणात गावठी दारू चे चांदुर बाजार तालुक्यातील केंद्र बिंदू बनलेले काजळी गाव.या गावात एकूण 10 गावठी दारू व्यवसाहिक होते.मात्र शरद भस्मे पोलीस उपनिरीक्षक यांच्या टीम ने या गावात सतत पेट्रोलीग करून अवैध गावठी दारू विक्री करणारे यांच्या दमचक करून सोडले.यामधील काही गावठी दारू विक्री आता छुप्या मार्गाने करीत आहे.त्यांच्यावर पोलिसांची नजर असल्याचे समजत आहे.
दिनांक 21 सप्टेंबर ला पेट्रोलीग दरम्यान काजळी येथील अवैध गावठी दारू विक्री करणारा प्रफुल्ल नागोराव वानखडे यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक गावठी दारूचा ट्यूब आणि काही बॉटल ताब्यात घेतल्या.मात्र पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल वानखडे याला ताब्यात घेण्या आधीच तो फरार झाला.या मध्ये पोलिसांनी 60 लिटर गावठी दारू जप्त केली आहे.तर फरार आरोपी वर गुन्हची नोंद करण्यात आली आहे.फरार आरोपीचा शोध चांदुर बाजार पोलिस टीम घेत आहे.
ही कार्यवाही ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे,पंकज फाटे,शाम सोनोने,पंकज गोलाइतकर,प्रणाली बावनेर यांनी रेड करून केली.