श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी केली मतदार नोंदणी जनजागृती

0
941
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे तहसिलदार  विश्वनाथ घुगे यांनी केली मतदार नोंदणी जनजागृती
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी केली मतदार नोंदणी जनजागृती
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरसिंग महाराज मंदिर पटांगण,अकोट येथे सायंकाळी कालदि.22 ला रा. ०८.०० वाजताच्या महाआरती करीता उपस्थित नागरिकांमध्ये तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी केली मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबवले.मतदार जनजागृती करण्याचे उद्देशाने मा.जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, उपजिल्हाधिकारी निवडणूक कु.वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विश्वनाथ घुगे, तहसीलदार अकोट यांनी कार्यक्रमात मतदारांना आगामी काळात असलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकी बाबत, मतदार नोंदणी करणे बाबत, मतदार यादीमध्ये महिला मतदारांचा समावेश करणे बाबत मार्गदर्शन केले.

तसेच राजेश गुरव,नायब तहसिलदार निवडणूक अकोट व सिद्धांत वानखडे, संगणक परीचालक यांनी मा.भारत निवडणूक आयोग यांच्या NVSP.IN या ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याबाबतचे संकेतस्थळा बाबत व मतदार यादीतील मतदारांचे नाव मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी उपलब्ध करून दिलेल्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळा वर कसे शोधावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर कार्यक्रमा करिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरसिंग महाराज मंदिर पटांगण चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..