भूमी फाउंडेशनचा जलजागर ; भूमीच्या  निर्माल्य संकलन उपक्रमाला आकोट वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
847
भूमी फाउंडेशनचा जलजागर ; भूमीच्या  निर्माल्य संकलन उपक्रमाला आकोट वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भूमी फाउंडेशनचा जलजागर ; भूमीच्या  निर्माल्य संकलन उपक्रमाला आकोट वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनीधी

सामजिक क्षेञात विदर्भ भर कार्यरत असलेली.नेहमीच कला, संस्कृती,लुप्त होत चाललेल्या कलेसाठी जलसंर्वधण,वृक्षारोपण,समाजातील आदिवासी व गरजवंतासाठी विद्यार्थीसाठी सदैव कार्यरत असलेली तरुणाई भूमी फाऊंडेशन माध्यमातून समाजिक उपक्रमाने आपली ओळख निर्माण करणारी संस्था भूमी फाऊंडेशन.

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा व्हावा व गणेशोत्सव मध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून भूमी फौंडेशन विदर्भ अकोट तर्फे निर्माल्य संकलन साठी निर्माल्य रथ तयार करण्यात येऊन ।।पर्यावरण पुरक उत्साह साजरे करण्याचा आग्रही असल्यामुळे दरवर्षी गणपती उत्सावातील निर्माल्य (हार,फुल,दुर्वा)जलाशयात न टाकता त्याचे संकलन करुन व पाविञ्य कायम ठेऊन गोळा झालेल्या निर्माल्याचे योग्य प्रकारे विल्लेवाट लावण्यात आली.

भूमी निर्माल्य रथाला अकोट शहरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी नारळ फोडून व ध्वज दाखवून निर्माल्य रथाला प्रांभर केला.भूमीच्या पर्यावरण पुरक व निर्माल्य संकलन व ईतर समाजिक चळवळीचे कौतुक करुन भूमीतील तरुणाचा उर्जादाई शब्दांनी उमेद व उत्साह द्विगृणीत केला.

भूमी निर्माल्य रथाची गणेश मंडळे वाट पाहत होती.उत्स्फूर्त प्रतिसाद घरगुती व मंडळा कडून मिळत आहे.भूमीच्या या उपक्रमासाठी भूमीचे सर्वश्री कु.चंचल पिताबंरवाले,सौ.शिल्पा राठी,अँड रुचा ठाकूर,,विशाल राठौड,कमलेश राठी,अगस्ति ठाकूर,आकाश धुमाळे,अक्षय जायले,अमोल पवार,हर्षल बाहदुरे,सुनिल मस्करे,निमार्ल रथाचे सारथ्य अजय तेलगोटे तर संचालन संतोष विणके तर सर्वाचे आभार पत्रकार तुषार अढाऊ यांनी केले.