अवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपी याना अटक

195

अवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात
दोन आरोपी याना अटक

चांदुर बाजार :-प्रतिनिधी
स्थानिक चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात देशी दारूची वाहतूक सुरू होती.याची गुप्त माहिती चांदुर बाजार चे ठाणेदार अजय आकरे लागताच त्यांनी आज टाऊन भागात साई मंदिर परिसरात गुप्त माहिती च्या आधारे नाकाबंदी करून होणाऱ्या देशी दारूचा वाहतूक चा डाव उधळून लावला.

या कार्यवाही मध्ये पोलिसांनी प्ललसर गाडी दोन देशी दारू च्या पावत्या असलेली दोन पेटी जप्त केली आणि दोन आरोपी याना ताब्यात घेण्यात आले.या कार्यवाही मध्ये त्यांनी एकूण 30760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या मध्येआरोपी 1)निशांत वानखड़े वय 29 वर्ष 2) श्रीकृष्ण इंगले वय 39 वर्ष दोन्ही राहणार शिराला या ना  अट क करण्यात आली. कार्यवाही ठाणेदार अजय आखरे याच्या मार्गदर्शनखाली हेड कॉस्टबल दिलीप नांदुरकर यांचे पथकातील हेड कॉस्टबल शंकर कासदेकर ,नाईक पोलीस कॉस्टबल निकेश नशिबकर , पोलिस कॉस्टबल रवि कांबले यांनी केली आहे.दोन्ही ही आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.