चांदुर बाजारच्या संजूभैया चे मूग भजे * खाऊन तर पहा*

0
1271
चांदुर बाजारच्या संजूभैया चे मूग भजे * खाऊन तर पहा*
चांदुर बाजारच्या संजूभैया चे मूग भजे * खाऊन तर पहा*
Google search engine
Google search engine

चांदुर बाजारच्या संजूभैया चे मूग भजे
* खाऊन तर पहा*

वृत्त संकलन:-किशोर मेटे चांदुर बाजार

भारतीय खाद्य संस्कृती प्राचीन व समृद्ध अशी खाद्य संस्कृती असून या खाद्य संस्कृतील खाद्य पदार्थांने सातासमुद्रापार खवय्यांना वेड लावले असताना।
असाच ग्रामीण खाद्य संस्कृतीशी जुळलेला गरिबांपासून ते श्रीमंता पर्यत लहान मोठ्याना आवडणारा खवव्याच्या पहिल्या पसंतीचा चटपटीत पदार्थ म्हणजे भजे।
भारतीय खाद्य संस्कृतीत भज्याची विवीध प्रकार लग्न समारंभ ते हॉटेल पर्यत पहायला मिळत असून चांदुर बाजार शहरात लहान मोठ्या व्यसायाकानी हात गाड्यावर मूग भज्यांची दुकाने थाटली आहे। अशाही स्पर्धेत गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मूग भजे बनवण्याच्या कौशलामुळे संजूभैया यांनी मुगभज्याचे अस्तित्व कायम ठेवत खवव्याच्या जिभेवर अधिराज्य गाजवत आहे।
संजय लक्ष्मीनारायणजी पालिवाल हे उच्चशिक्षित असून दहा वर्षांपूर्वी त्यांनी मूग भज्याचा व्यवसायाला सुरवात केली असून यशस्वीपणे ते आपला व्यवसाय सांभाळत ग्राहकाना उत्तम सेवा देत आहे। संजूभैया याचा मूग भज्यांचा व्यवसाय हात गाडीवर असून दोन वाजता च्या सुमारास त्याच्या मूग भज्याची गाडी बाजारात लागते। मुगभजे काढण्याची प्रक्रिया सुरू होताच भट्टीवर कढईतुन तळलेल्या भज्याचा खमंग वास आजूबाजूला दरवळताच खमखमीत खटई , झणझणीत चटणी ,कांदा सोबत गरम लुसलुशीत भज्यावर ताव मारण्याकरिता खवव्याची पाऊले आपुसकच संजूभैया याचा मुगभज्यांच्या हातगाडी कडे वळलात ।
संजूभैया याचा हात गाडीवर दिसणारा व्यवसाय शोटासा असला तरी ग्राहकांची गर्दी पाहता रोज मूग भज्या करिता 35 किलो डाळ भज्या करिता लागते। भजे खान्या करिता हातगाडी जवळ ग्राहकाची झुबड उडत असून ग्राहकांना मुगभजे खटई, चटणीवर ताव मारण्या करीता प्रतिशा करावी लागते। या व्यवसातून संजूभैया यांना स्वयंम रोजगार मिळाला असून या व्यवसायातुन मिळनाऱ्या उत्पानामुळे संजूभैया परिवारासहित , आपल्या मुलांना चागले शैक्षणिक भविष्य देत आहे। संजूभैया याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आदर्श असून नरेंद्र मोदी यांनी पकोडे विक्रीताही मोठा व्यवसायिक होऊ शकतो या प्रेरणेने आपला प्रामाणिक पणे व्यवसाय करीत आहे। अंत्यत प्रेमळ व स्वयमी स्वभावामुळे व ग्राहकांना आपले दैवत मानणारे संजूभैया आपला प्रामाणिक व्यवसाय करीत असून त्याच्या मूगभज्याने भल्या भल्याना वेढ लावले आहे । शहरात दाखल झालेल्या पाहुना हमखास मुगभज्यांची चव चाखून सुखावून जातो। आपल्या या वैशिष्टपूर्ण चवीमुळे मुगभज्यांची प्रसिद्ध दूरवर पसरली आहे। तरी एकदा या परिसरात आलातर एकदा हे मुगभजे खाऊन पहा।