शहर पोलीसांच्या सतर्कतेने शिवाजी महाराज चौकात फाशी घेणाऱ्या तरुणाचे वाचले प्राण

0
1449
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनिधी

शहर पोलीसांच्या सतर्कतेने शिवाजी महाराज चौकात फाशी घेणाऱ्या एका तरुणाचे जीव वाचला.पोलीसांकडुन मिळालेल्या आधिक माहीतीनुसार आज दिनांक 26।9।18 रोजी संध्याकाळी अचानक एका तरुणाने शिवाजी चौकातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतांना गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचारी नासीर शेख ह्यांचे नजरेस पडला, त्यांनी व चौकात कर्त्याव्यवर असलेल्या वाहतूक कर्मचारी ठाकूर, फोकमारे, लापूरकर ह्यांनी धाव घेऊन त्याला आत्महत्या करण्या पासून रोखले व पोलीस स्टेशन ला आणून पोलिस निरीक्षक गजानन शेळके , सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांचे समक्ष उभे केले. त्यांनी चौकशी केली असता त्या युवकाचे नाव सचिन बोरोळे असल्याचे कळत असून त्याची तब्येत नेहमी खराब राहत असल्याने शारीरिक आजार बळावला होता, त्या त्रासाला तो कंटाळला होता, त्या मूळे त्याचे संतुलन सुद्धा ढासळले होते, त्या मुळे त्याने शिवाजी चौकात झाडाला फाशी घेण्यासाठी दोर बांधला पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्याचा जीव वाचविला, पोलिस निरीक्षक गजानन शेळके व सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांनी त्याचे समुपदेशन करून त्याची समजूत घालून त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले ह्या बाबत चौकशी अंती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.