विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही : कलम ४९७ रद्द सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

0
3061
Google search engine
Google search engine

स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ऐतिहासिक निकाल देत कलम ४९७ रद्द केली आहे .
पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे. भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम ४९७ हा महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हे कलमच रद्द केलं आहे.