*सर्व पत्रकारांना एसटी बसेस , शिवनेरी व शिवशाही बसेस चा मुक्त प्रवास करण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले निवेदन*

0
2105
Google search engine
Google search engine

महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण- शहरी भागातील पत्रकार बंधू- भगिनींना बातम्या कव्हर करण्यासाठी शहर तालुक्यात फिरावे लागते, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो..

याचाच विचार करून पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे आणि सचिव/ उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने नागपूर चे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. आशिष आटलोए यांच्या मार्फत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना नागपूर येथे निवेदन दिले होते.
यावेळी रावते म्हणाले की,तुम्ही पत्रकार मंडळी आपले जीवाचे रान करून पत्रकारिता करत असता, आपल्या कष्टाचे चीज झाले पाहिजे.
पत्रकार संरक्षण समितीने डिसेंबर 2017 मध्ये पत्रकारांना शिवशाही व शिवनेरी बसेस मध्ये मुक्त प्रवास देण्याचे पत्र दिले होते , त्या पत्राचा आम्ही आम्ही जाणीवपूर्वक विचार करून त्यासंदर्भात कारवाही केली होती व आपनास एसटी शिवशाही व शिवनेरी बसेस चा वापर कारण्यासंदर्भात आपल्या खात्याला सांगितले होते.त्यामुळे आपले पुन्हा पत्र मिळाल्याने आम्ही सर्व अधिकृत पत्रकारांना एसटी बसेस , शिवशाही , शिवनेरी बसेस मध्ये आपल्याला फ्री मध्ये प्रवास देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.