व्यभिचार आणि समलैंगिकता गुन्हा नाही, तर तोंडी तलाक गुन्हा कसा ? – ओवैसी

0
739
Google search engine
Google search engine

भाग्यनगर – व्यभिचार आणि समलैंगिकता हा गुन्हा नसतांना तोंडी तलाक हा गुन्हा कसा ठरू शकतो ?, असा प्रश्‍न एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करून विचारला आहे.

ओवैसी म्हणाले की, न्यायालयाने तोंडी तलाकला घटनाबाह्य ठरवलेले नाही, तर ते रहित केले आहे; मात्र समलैंगिकता (कलम ३७७) आणि व्यभिचार (कलम ४९७) यांच्या विषयी न्यायालयाने ‘घटनाबाह्य’ हा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे या निकालातून भाजप सरकार बोध घेईल, अशी अपेक्षा आहे. सरकारने तोंडी तलाकविरुद्धचा घटनाबाह्य अध्यादेश मागे घ्यावा’, अशी मागणी त्यांनी केली.