अकोल्याच्या दोन युवकांनी हीमालयातील ६००० मिटर उंचीचे शिखर सर करत रचला नवा अध्याय

475

अकोला/संतोष विणके

जम्मू काश्मीर येथे गिर्यारोहणासाठी गेलेले अकोल्यातील दोन युवक अक्षय श्रीवास व अंकुश डोंगरे यांनी हिमालयीन रेंजमध्ये येणाऱ्या गोलॕप कांगरी या अत्यंत जहाल, कठीण व जीवघेण्या ६००० हजार मीटर उंच शिखरावर अत्यंत कठीण परिस्थितीत टेक्निकल रुटने जाऊन हे शिखर अल्पाइन स्टाईल मध्ये सर केले.

या दोघांच्या या यशाने अकोल्याचे नाव देशभरात गौरवाने घेतल्या जात आहे.अक्षय व अंकुश यांनी एक्सपिडिशनसाठी लागणारे साहित्य व प्रशिक्षण जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ मोंटीनेअरींग ॲन्ड विंटर स्पोर्टस नुनवन पहलगाम (जम्मू कश्मीर)मधून पूर्ण केले व दिनांक 18 सप्टेंबर 2018 रोजी माउंट गोलॕप कांगरी शिखर यशस्वीरित्या सर केले आपल्या या यशाने त्यांनी अकोल्याचे नावलौकिक केले.

अक्षय हा आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार महेश श्रीवास यांचा मुलगा असून या कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस चे ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांनी दोघांचे कौतुक करीत त्यांना माउंट एवरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित केले.व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।