काँग्रेस आय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे यांचा उमरग्यात जागा हडप करण्याचा प्रयत्न

0
1234

व्यक्तीच्या कब्जेतील घरजागा बेकायदेशीररित्या रजिस्ट्री करुन हडप करण्याचा काँग्रेस आय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे यांचा प्रयत्न

उस्मानाबाद प्रतिनिधी : उमरगा येथील धनधांडगे राजकिय पुढारी व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश विश्वनाथ आष्टे व त्यांचे जावई शिवसेनेचे कार्यकर्ते व कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन दिलीप जाधव यांनी उमरगा येथील रहिवाशी सुभाष तुळशीराम सुर्यवंशी राहणार पतंगे रोड यांच्या कब्जेतील व वहिवाटीतील प्लाॅट क्रमांक ४६/१५ हा कोर्टाचा स्टेटस-को असताना व तो कायदेशीर कब्जेदार नसताना मधुसुदन दादाराव सुर्यवंशी यांच्याकडून बेकायदेशीररीत्या खरेदी केला. वास्तविक मधुसुदन हा कायदेशीर मालक नाही व कब्जेदार नाही, असा उमरगा येथील न्यायालयाने व अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला असताना पैशाच्या जोरावर राजकीय पदाचा वापर करुन नगरपरिषदेच्या मुख्याध्याकार्यांना व कर्मचारी सुरेश व्यंकटराव भोसले यांना हाताशी धरुन बेकायदेशीररीत्या झोन दाखला हस्तगत केला.वास्तविक सुभाष सुर्यवंशी यांनी नगरपरिषदेमध्ये कोर्ट मॅटर चालू असल्यामुळे व कोर्टाचा स्टेटस-को असल्यामुळे झोन दाखला देण्यात येऊ नये असा तक्रारी अर्ज दिला होता.तत्कालिन मुख्याधिकारी श्री. चव्हाण साहेब यांनी झोन दाखला देता येत नाही असा शेरा मारला होता.त्यानंतर श्री.गायकवाड यांनी दि.१८/०५/२०१८ च्या मधुसुदनच्या झोन दाखला मागणीच्या अर्जावर कोर्ट मॅटर चालू असल्यामुळे झोन दाखला देता येत नाही. असे पत्र मधुसुदन यास दिले होते.तरी पण दि. १८/०५/२०१८ च्याच अर्जावर झोन दाखला दिला गेला व त्या दाखल्यानुसार दि. २२/०६/२०१८ रोजी प्रकाश आष्टे व सचिन जाधव यांनी बेकायदेशीररीत्या रजिस्ट्री करुन घेतली.यानंतर सुभाष सुर्यवंशी यांच्या तक्रारी अर्जावर नंतरचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दि. ०५/०७/२०१८ रोजी प्रकाश आष्टे व सचिन जाधव यांच्या नावाची नोंद कोर्ट मॅटर चालू असल्यामुळे रिव्हीजन रजिस्टरला घेता येत नाही असे एका पत्राद्वारे कळवले.सदरील खरेदीखताच्या आधारे प्रकाश आष्टे व सचिन जाधव हे सुभाष सुर्यवंशी यांच्या कब्जेतील जागेमध्ये येऊन त्यांच्या भाडेकरु दुकानदारांना जागा खाली करण्याची धमकी दिली तो असे न केल्यास बुलडोजर लावून दुकाने पाडण्यात येतील अशी धमकी सुभाष सुर्यवंशी यांना व त्यांच्या दुकानदारांना दिली. यात कहर म्हणजे प्रकाश विश्वनाथ अाष्टे व सचिन दिलीप जाधव यांनी त्यांचे गुंड-हस्तक काँग्रेसचे नगरसेवक विक्रम शहाजी मस्के यांना जागेचा ताबा घेण्यासाठी दि.१२/०९/२०१८ रोजी पाठवले.दि.१२/०९/२०१८ रोजी विक्रम मस्के व त्यांचे गुंड साथीदार १० ते १२ माणसे व ७ ते ८ बायका यांनी येऊन एका बंद दुकानाची कुलुपे तोडण्याचा प्रयत्न केला व दुकानावर विक्रम शहाजी मस्के असा बोर्ड लावला असे कृत्य करण्याविषयी सुभाष सुर्यवंशी यांनी विक्रम शहाजी मस्के यांस विनंती केली असता मी ही जागा प्रकाश आष्टे व सचिन जाधव यांच्याकडून भाड्याने घेतली असे सांगितले. याबाबत रजिस्ट्री झाल्यापासून सुभाष सुर्यवंशी यांनी वेळोवेळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दिलेला असताना त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही. दि.१२/०९/२०१८ रोजी पोलिस स्टेशनला लेखी तक्रार देऊन त्याचा एफ.आय.आर.फाडण्याची विनंती केली तरी पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही.सर्वात कहर म्हणजे ज्या प्रकाश पाटील सी.अो.नी.सदरील रजिस्ट्रीची नोंद घेता येत नाही असे दि.०५/०६/२०१८ रोजी कार्यालयीन पत्राद्वारे कळविले असताना सुध्दा परत दि.१०/०९/२०१८ रोजी प्रकाश आष्टे व सचिन जाधव यांच्या दबावाखाली त्यांच्या नावाची नोंद रिव्हीजन रजिस्टरला घेतली विशेष म्हणजे कार्यालयीन कर्मचारी सुरेश भोसले यांनी आपल्या सहीनिशी झोन दाखला दिला व ज्या दिवशी रजिस्ट्री झाली त्याच दिवशी जाहीर प्रगटन काढले व ते दि.२७/०६/२०१८ रोजी सदरील वादग्रस्त जागेवर लावले.
अशा प्रकारे प्रकाश आष्टे व सचिन जाधव हे पैशाच्या जोरावर राजकीय पदाचा वापर करुन दहशत पसरवून सदरील जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.याची संपूर्णपणे चाैकशी करुन मला न्याय मिळावा व पोलिसांकडून मला संरक्षण मिळावे असे वरील उद्गार दैनिक जनसत्येचे प्रतिनिधी यांना सुभाष सुर्यवंशी यांनी मुलाखतीत सांगितले व याची एक प्रत मानवी हक्क अभियान शाखा उमरगा यांना व बजरंग दल उस्मानाबाद यांच्याकडे दिल्याचे सांगितले.तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक उस्मानाबाद , जिल्हाधिकारी उस्मानाबाद व उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा यांच्याकडेपण तक्रारी अर्ज दिलेले असताना कसलीच दखल घेतली गेली नाही असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले व यापुढे माझ्या जिवीतास धोका व माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहिल असे तक्रारीत नमुद केले आहे तसेच सुभाष सुर्यवंशी यांनी विक्री केलेल्या जागेची माहिती नगरपालिकेला माहिती आधिकाराखाली मागीतली असता असता तेथे रेकाँर्ड नसल्याचा धक्कादायक प्रकारही माहिती अधिकारात उघड झाला आहे सुभाष सुर्यवंशी हे मागासवर्गीय समाजाचे आहेत यांनी सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याचेही सांगीतले आहे या जागेवर सुभाष सुर्यवंशी व त्यांच्या कुटूंबीयाचा बर्याच वर्षापासून कब्जा आहे