‘एसएफआय’चा राज्यस्तरीय विद्यार्थी मेळावा सोमवारी नांदेडात

0
1133
Google search engine
Google search engine

विद्यार्थ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :- राज्याध्यक्ष मोहन जाधव

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

बीड (ता.२९) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी आयोजित राज्यस्तरीय विद्यार्थी मेळावा १ऑक्टोबर सोमवारी नांदेड येथे होणार आहे. येत्या ३० ऑक्टो ते २ नोव्हें २०१८ दरम्यान ‘एसएफआय’चे १६ वे अखिल भारतीय अधिवेशन शिमला येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन ‘एसएफआय’ ने केले आहे.

सर्वांना गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षण मिळावे, या मागणीला घेऊन हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन अंनिस कार्यकर्ते डॉ.किरण चिद्रावार करणार असून ‘एसएफआय’चे राष्ट्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेचे राज्याध्यक्ष मोहन जाधव मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. संघटनेचे राज्य बालाजी कलेटवाड, केंद्रीय सचिवमंडळ सदस्य दत्ता चव्हाण, केंद्रीय कमिटी सदस्य मंजुश्री कबाडे यांची या मेळाव्याला उपस्थिती असणार आहे. राज्यातील सद्य शैक्षणिक स्थिती व ‘एसएफआय’च्या संघटनात्मक कार्यावर चर्चा या मेळाव्यात होणार आहे. तसेच मेळाव्याच्या समारोप सत्रात संघटनेच्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी राज्यातील प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे.

या मेळाव्यानिमित्त सोमवारी नांदेड शहरात महात्मा फुले पुतळा ते पीपल्स महाविद्यालय अशी विद्यार्थी रॅली काढण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यकर्ते जाणार आहेत. अशी माहिती ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, राज्य कमिटी सदस्य सुहास झोडगे, जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे, जिल्हा सचिव रुपेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लहु खारगे, दत्ता सोळंके, संतोष जाधव, राहुल मोताळे, रवि जाधव, अहमद पठाण, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर मुंडे, अशोक शेरकर, नदाफ जाकेर, ज्योतीराम कलढोणे, अशपाक सय्यद, विजय राठोड, मुंजा फड, अंकुश कोकाटे, रवि राठोड, सानप बायजा, राम नवले, गोपाल निरडे, सम्राट डोंगरे, आकाश सासवड, प्रविण चव्हाण, नितीन राठोड, विठ्ठल घोरड, महेश गिरी, अंकुश गवळी, अंगद गावडे, रवी मोरे, शिवा चव्हाण, आकाश जाधव, युवराज भालेकर, सौरभ जाधव, आदींनी दिली आहे.