दर्ग्यावर देवदर्शनाला गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू – मुलाला वाचविण्याचा प्रयत्नात वडीलांसह मित्राचाही मृत्यू

0
3219
Google search engine
Google search engine

अतुल काळे (वरुड)-

तालुक्यातील पांढरी घाटापासून मध्य प्रदेश हद्दीतील पाक नदीच्या डोहात बुडून लहान मुलासह तिघांचा बुडून मृत्यू झाला मृतक हे अमरावतीचे रहिवासी असून ते झरनेवाले बाबांच्या दर्ग्यावर दर्शनाकरिता दुचाकीने आले होते , देवपूजा सुरू असताना लहान मुलाचा पाय घसरून पाण्यात बुडताना दिसताच वडिल वाचविण्याकरिता डोहात गेले , तर बापलेक बुडताना पाहताना सोबतच असलेल्या मित्रांनी सुद्धा वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न केला मात्र तिघेही डोहात बुडून मरण पावले . ही घटना दुपारी साडेबाराच्या दरमान घडली असून वनविभागाचे अधिकारी गस्तीवर असतांना हा प्रकार लक्षात येता त्यांनी आठणेर पोलिसांना माहिती दिली सायंकाळी पाच वास्तचा दरमान मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश

प्राप्त माहितीनुसार मृतकाचे नाव मो.साकीर अब्दुल कदीर 40 वर्ष राहणार खुर्शीदपुरा गवळीपुरा अमरावती , नितीन सुखदेव बोरकर 42 वर्ष राहणार प्रभात कॉलनी बडनेरा आणि मो साकीर यांचा पाच वर्षीय मुलगा मो.हसनेन मो शाकिर असे नाव आहे हे लहान मुलाला घेऊन हिरोहोंडा दुचाकी क्रमांक MH-27 Q2524 दुचाकीने अमरावतीवरून वरुड तालुक्यातील पांढरघाटी लगत असलेल्या मध्य प्रदेश हद्दीतील आठणेर रस्त्यावर पाक नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झरणेवाले बाबांच्या दर्ग्यावर देवदर्शनाकरिता सकाळी अकराचा दरमान पोहचले होते. पूजा अर्चा करताना लहान मुलगा याचा पाय घसरला त्याला वाचवण्याकरिता बापाने उडी घेतली ते सुद्धा डुबत असताना त्याचा मित्र नितीन बोरकर यांनीही पाण्यात उडी घेऊन बापलेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तिघांनाही जलसमाधी मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, घनदाट जंगलात वन कर्मचारी डीएस चव्हाण, धर्मेंद्र सिंह, चौधरी, मिश्रा हे कर्मचारी जंगलात गस्तीवर असताना डोहातील पाण्यावर मुलाचे प्रेत तरंगताना आढळून आले वनकर्मचाऱ्यांनी ही माहिती आठणेर मध्य प्रदेश पोलिसांना दिली यावरून दुपारी पोलिसांनी घटनास्थळ गाठून सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान तिन्ही मृतदेह बाहेर काढले मृताच्या खिशात वाहनचालक परवाना ने आधार कार्ड काठावर एक मोबाईल सापडला यावरून शोध घेतला असता तिघेही अमरावती असल्याचे निष्पन्न झाले नातेवाईकांना पोलिसांना माहिती दिली असून तिन्ही मृतदेह आठनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले असून या घटनेचा पंचनामा आठनेर चे ठाणेदार अजय मरकाम एएसआय परतेती करीत आहेत . पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे