राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केले महागाई विरोधात मुक आंदोलन

0
690
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज ०२ आक्टोंबर संपुर्ण भारत देश राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची पुण्यतिथी करीत आहे.
याच पुण्यतिथी दिवसाचा आसरा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपुर्ण महाराष्ट्रात महात्मा गांधीजींच्या पुतळा किंवा फोटो ठेवुन अभीवादन करुन नेहमीत होत असलेल्या शासनाच्या धोरणांचा व महागाईचा चटका सर्व सामान्य जनतेला लागत आहे मग पेट्रोल,गॅस,तसेच नेहमीत लागणाऱ्या जीवणावषक वस्तूंच्या महागाई मूळे जणता त्रस्त झाली आहे याचा विरोध करत काळ्या फिती लावुन मुक आंदोलन केले असेच आंदोलन शेगांव शहरामध्ये शिवाजी महाराज चौक येथे झाले.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंतु या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना विसरली कि काय अस दिसते कारण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी सोबत आज लाल बहादुर शास्त्री यांचीही पुण्यतिथी आहे पण त्यांचा फोटो या आंदोलनात दिसत नव्हता.