प्रहारच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची यशस्वी सांगता… ; प्रशासनाचे घालीन लोटांगन…

0
1135
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

गेल्या ६ दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हा अध्यक्ष तुषार पुंडकर यांनी आकोट येथील श्री शिवाजी महाराज चौकात शेतकरी,दिव्यांग व्यक्ती,सर्वसामान्य नागरिक यांच्या मागण्यांबाबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडले होते.गेल्या दोन दिवसांत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अविरत प्रयत्न करून त्यापैकी काही मागण्या पूर्ण केल्या तर काही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी दिले असल्याचं प्रहारच्या वतीने सांगण्यात आले आहे..

त्यामुळे प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन व सणउत्सवांच्या दिवसांत प्रशासनावरील ताण आणखी न वाढविता बेमुदत आंदोलन आज मागे घेतले.

दिनांक २७/०९/२०१८ भगतसिंग याच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहारच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरवात करण्यात आली होती. विविध १० मागण्या करिता हे आंदोलन करण्यात आले.मागण्याची पूर्तता झाल्या नंतर आज गांधी जयंती दिनी उपोषनाची सांगता करण्यात आली. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले पिता पुत्र महादेव खडेकार व सुरेंद्र खडेकार या दिव्यांग व्यक्तिच्या हस्ते मोसंबीचा रस घेऊन “अन्न त्याग” आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी आकोट पो. स्टे. चे ठाणेदार गजानन शेळके , माजी नगर अध्यक्ष रामचंद्र बरेठीया, मा.जि प उपाध्यक्ष गजानन पुंडकर , सरपंच संगटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आवारे , डॉ. जपसरे यासह पधादीकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी शेतमजूर याची मोठया प्रमाणात उपस्थित होती.

दरम्यान तुषार पुंडकर याना पुढील वैधकीय उपचारा करिता डॉ. जपसरे याच्या दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
त्यांच्या तब्येतीची तपासणी सरकारी डॉक्टरांनी केली असता उपोषनाच्या दिवसी ६८ किलो असलेले वजन ५९ किलो वर आले तर किटोन व्हॅल्यू वाढलेली आढळली त्यामुळे त्यांना भरती होण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.पन तुषार पुंडकर आपल्या निर्णय वर ठाम राहिले ढासळती प्रकृती व त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला विविध स्तरातून मिळत असलेला पाठिंबा व बाळापूर, अकोला, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ निवेदने दिल्या गेलीत तर आकोट तालुक्यातील मुंडगाव,आसेगाव, चोहोटा बा. व बळेगाव या गावांमध्ये कँडल मार्च काढण्यात आला.तर तालुक्यातील जवळपास ५५ ग्रामपंचायतींनी आंदोलनाला पाठिंबा दिला यासर्व बाबीचा दबाव प्रशासनावर होता ४ आणि ५ दिवस प्रशासनाने युद्ध स्तरावर पावले उचलून प्रहार पधादीकारी याच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली

यामध्ये आंदोलनात करण्यात आलेल्या विविध मागण्यांवर वर चर्चा करून पूर्तता करण्यात आली व तसे लेखी देण्यात आले असल्याचं प्रहारने कळवले आहे. यामध्ये प्रामुख्याने
पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची नियुक्ती , भूमिहीन , शेतकरी , विधवा , अपंग यांना राशन कार्डवर धान्य तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची दखल घेण्यात आली.समारोप प्रसंगी आंदोलना ची भूमिका निखिल गावंडे यांनी विषद केली संचालन अनंत गावंडे यांनी केले .
कुलदीप वसु , सागर उकंडे , अवि घायसुंदर , राहुल देशमुख, विशाल भगत , गणेश गावंडे , संदीप मर्दाने , किरण साबळे,निखिल दोड , रितेश हडोळे, अचल बेलसरे , छोटू चोधारी, जीवन आखरे , चेतन नाचणे , सुशील तायडे आदींची यावेळीउपस्तीथी होती. उपोषनाची यशस्वी सांगता फटाके फोडुन व ढोल तासे वाजवून करण्यात आली.