विज बिल सेटलमेंटचा नावाखाली ग्राहकांची लूट; विद्युत अभियंता कडून थेट पैशाची मागणी; सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

0
1247
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

मागील अनेक दिवसापासून तालुक्यातील वीज ग्राहकांना कुठलेही मीटर रीडिंग न घेता अव्वाच्यासव्वा विज बिल देण्यात येत आहे. जास्त आलेले हे विज बिल सेटलमेंट करण्याच्या नावावर शहर अभियंता कडून संबंधित ग्राहकाना हजारो रुपयांची मागणी केल्या जात आहे. मागणी केलेली रक्कम दिली तरच सेटलमेंट करून दिल्या जाते. असा प्रकार शहर विद्युत कार्यालयातील शहर अभियंता विपुल बनवरे यांच्याकडून केले जात आहे. त्यांचा या पराक्रमाची संबंधित ग्राहकांनी तयार केलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आज दैनंदिन जीवनात विजेला अनन्य साधारण महत्त्व आलेले आहे. घरातील अनेक उपकरणे विजेशिवाय चालू शकत नाही. त्यासाठी नागरिकांना 24 तास विज उपलब्ध हवी असते. मात्र याचाच फायदा घेऊन शहरात गेल्या काही महिन्यापासून शहर विद्युत कार्यालयातील अधिकाऱ्यांचा खाबूगिरी चा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे . शहरातील अनेक ग्रहकांची विद्युत मीटरची रिडींग न घेता वीज बिले देण्यात आली आहे. ही वीज बिले विहित मुदतीत भरणे आवश्‍यक आहे. मात्र लाखोंच्या घरात आलेले वीज बिल पाहून संबंधित ग्राहकणा डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. ही अवाढव्य बिलाची रक्कम मीटर रिडींग नुसार देण्यात यावी यासाठी संबंधित ग्राहक वारंवार तक्रारी करतात. परंतु त्यांचा या तक्रारीची साधी दखल ही घेतल्या जात नाही. तक्रारीनंतर ही नव्याने मीटरची तपासणी ना करता याउलट विद्युत अभियंता विपुल बन्नोरे वीजग्राहकांना विज बिल सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली थेट पैसाची मागणी करतात. हा पैसे उकळण्याचा गोरख धंदा बनवरे यांनी चालवला असल्याचे या ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होते.
महावितरण तर्फे शहरातील एका दुकानदाराला एका लाखाच्यावर विज बिल देण्यात आले. या आलेल्या वीज बिलाची तक्रार ग्राहकाकडून शहर कार्यालयात देण्यात आली होती. मात्र या वीज बिलाची कोणतीही चौकशी न करता शहर अभियंता विपुल बनवरे यांनी चक्क त्या ग्राहकाशी संपर्क साधून विज बिल सेटल करून देण्याचे आमिष देऊन पन्नास हजार रूपयांची मागणी केली. अश्या तर्हेने या महाभाग विदूत अभियंत्या ने महावितरणच्या तिजोरी ला सुरुंग लावला आहे.
या शहर अभियंताचा सदर विद्युत ग्राहकाला सतत पैशाचा मागणीची त्रास होत असल्याने या पैशे मागणीची ऑडिओ रेकॉर्डिंग सदर ग्राहकाने स्टिंग ऑपरेशन करून आपल्या मोबाईल मध्ये केली आहे. सद्या ही रेकॉर्डिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वीकडे व्हायरल होत आहे. एकीकडे उत्कृष्ट अभियंता असल्याचा बनाव करत विद्युत वितरण कंपनीचे शहर अभियंता विपुल बनवरे मागील साडेचार वर्षांपासून शहरात असाच गोरख धंदा चालवीत आहे. . त्यामुळे अशा भ्रस्ट अधिकारीही चौकशी वरिष्ठ अधिकारी कडून होणे गरजेचे आहे. या साठी तालुक्याचे विद्युत उपविभागीय अभियंता वानखडे याकडे लक्ष देतील काय?हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.