प्रहारचे दर्यापूर नगरपरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

0
652
Google search engine
Google search engine
दर्यापुर / विशेष प्रतिनिधी – 
दर्यापूर नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून शहरातील मुख्य रस्त्यालगत चे संपूर्ण अतिक्रमण हे गेल्या एक महिन्यांपूर्वी शासकीय यंत्रणा लावून काढण्यात आले मात्र यामुळे सुमारे एक हजार व्यवसायिक व त्यांचे चार हजार कामगार हे बेरोजगार झाले आहे यातील बहुतांशी लोक अत्यंत गरीब कुटुंबातील सुद्धा आहेत दर्यापुर तालुका हा खारपाणपट्टा येत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करावी लागते संपूर्ण तालुका हा कृषिप्रधान आहे तालुक्यात कुठलीही उद्योगधंदे नसल्यामुळे तालुक्यात अनेक बेरोजगार व गरीब युवकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पान टपरी चहा टपरी भाजीपाला व्यवसाय रस्त्याच्या खाली जागेवर सुरू केले होते विशेष म्हणजे शासनाने आधीच सरकारी नोकऱ्या जवळपास बंद केले आहेत नोट बंदी मुळे मोठ्या उद्योग धंदे मंदावले आहेत या सर्व कारणांमुळे युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे प्रशासनाने जे लोक बेरोजगार झाली आहेत त्यांना नगरपरिषद हद्दीतील ठिकाणावर दुकाने बांधून त्यांना ती दुकाने भाडेतत्त्वावर द्यावी व त्यांचा उदरनिर्वाह सुरु करावा व हॉकर्स झोन निर्माण करावे 2012 पासून एकही अनुकंपाधारक नोकरी लाभ दिला नाही त्यामुळे नगरपरिषदेने अनुकंपाधारक नियुक्ती करण्यात यावी गावातील साचलेले सांडपाणी नाल्यात मोकळा करण्यात यावे राजपूत पूरपीडित भरपूर नदीवरील पुलाचे काम करीत प्रस्तावित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार च्या वतीने 4 ऑक्टोंबर रोजी नगर परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले होते यावेळी प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर , उपजिल्हा प्रमुख महेश कुरळकर दर्यापूर विधानसभा  प्रमुख  प्रदीप  चौधरी , दिनेश म्हाला , बाप्पुसाहेब साबळे , गणेश सरोदे , गजानन डीके , चेतन कळस्कर , सुरेश मानकर , सुधीर पवित्रकार , अनूप गावंडे , अनूराग मानकर , श्रीकृष्ण टाले , मिलींद गावंडे , अनिरुध्द चव्हाण , प्रविण धांडे , रोहित गवई , गजानन गावंडे , कौसीक अहमद, विजय टाले , सोपान कळस्कर , राजु कोल्हे , मंगेश सावळे’ , अन्यायग्रस्त नागरिक यावेळी उपस्थित होते