महिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन

119
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
स्थानिक खडकपुरा येथील महिला शेतकरी श्रीमती सुमन रामचंद्र कातोरे यांचे घराजवळील ओट्यावर ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता ह्रदयविकाराने दु:खद निधन झाले. घराजवळील शेतामध्ये सोयाबीन सोंगणे सुरू होते. त्यांच्याजवळ कोरडवाहु सहा एकर शेती आहे. त्यांचे पती माजी सैनिक रामचंद्र कातोरे यांचे ८ वर्षांपुर्वीच निधन झाले होते. त्यांना तीन मुले असुन त्या शेतीची कामे करीत होत्या. मृत्युसमयी त्या ६९ वर्षाच्या होत्या.