उस्मानाबाद लोकसभेसाठी शंकरराव बोरकरांना हिरवा कंदिल

0
2308
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शंकरराव बोरकरांना हिरवा कंदिल

हुकमत मुलाणी, उस्मानाबाद मो-9623261000

उस्मानाबाद- – उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपूत्र वाशी तालुक्यातील इंदापूर येथील रहिवाशी असलेले उद्योजक मा शंकरराव बोरकर यांनी सध्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शिवसेनेकडुन लोकसभेसाठी निवडणुक लढवण्यासाठी जय्यत तय्यारी सुरु केली आहे सध्या बोरकर यांनी मतदार संघातील नेते मंडळींशी संपर्क वाढवला आसून मतदार संघात निवडणुकीच्या पार्वभुमीवर सुशीक्षित बेरोजगार तरुणांसाठी बोरकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा उद्योग सुरू करणार आसल्याचीही चर्चा सुरु आहे तसेच तूळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी बोरकर यांचा मोलाचा वाटा तर आहेच परंतू उस्मानाबाद औरंगाबाद नविन रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी शंकरराव बोरकर यांनी प्रयत्न सुरु केले आहेत राजकीय पक्षांकडूनही शिवसेनेकडून उद्योजक शंकरराव बोरकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. बोरकर यानी नुकतेच मुंबईत जाऊन शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. यावेळी बार्शीतील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अब्बासभाई शेख,व जब्बारभाई महाजन हेही उपस्थित होते.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवेसेनेकडून बोरकरांना पसंती मिळणार आसल्याची याची चर्चा सुरु आहे. त्यातच, उद्योजक शंकरराव बोरकर यांनी पहिले पाऊल टाकले आहे. बोरकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उस्मानाबाद लोकसभा उमेदवारीसाठी चर्चा झाली. त्यानुसार बोरकर यांना तयारीला लागण्याचे सांगण्यात आल्याचे समजते. बोरकर यांच्या नावाची चर्चा जोरात होत आहे. तर, वर्तमान काळातील खासदारावर बार्शी तालुक्यातून नाराजीचा सुर दिसत आहे , उस्मानाबाद जिल्ह्याचा आति मागास जिल्ह्याच्या यादित तिसरा क्रमांक असलेला खोडून काढण्यासाठी शंकरराव बोरकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील एम आय डिसी लवकर सुरु व्हावी म्हणुन प्रयत्न सुरु केले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्द होईल त्यामुळे शंकरराव बोरकर यांच्या उमेदवारीला जनतेतून हिरवा कंदिल दिसत आहे