कोंड तावरजखेडा रस्त्याचे डांबर , खडी गुत्तेदाराने व इंजिनियरने केली गायब !

0
1112
Google search engine
Google search engine

 

उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यातील कोंड ते तावरजखेडा रस्ता अत्यंत खराब झाला आहे हा रास्ता सहा महिन्यापूर्वीच दुस्त केला होता या रसत्यावरील खडे हे ओबडधोबड बुजवले होते खड्यात थोडीच खडी व डांबर टाकून या रसत्यावरील पडलेले खड्डे बुजवले होते हाच रस्ता थातरमतर दुरुस्त करून सहा महिने झाले नाही तोपर्यंत रस्त्यावरील बुजवलेले खड्ड्यातील डांबर व खडी पूर्णतहा निघून गेलेले आहे या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झालेली आहे कोंड ते तावरजखेडा शिव पर्यंत रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे सदर सदर रस्त्याचे काम हे सहा महिन्यापूर्वी झालेले आहे पुढे रस्त्याचे काम झाले व मागे खड्डे उघडे पडले रस्त्याचे पुढे खड्डे बुजवले मागे उघडे पडले खड्ड्यातील माती तशीच ठेवून त्याच्यामध्ये डांबर व थोडिफार खडी टाकण्यात आली होती थोड्या प्रमाणात डांबराचा वापर करून नॉर्मल खडी चा वापर केला व रस्त्यावरुल खड्डे बुजवल्याचे नाटक हे इंजिनीयरने मलिदा घेऊन केल्याचा संशयही वाहनधारकाकडून व्यक्त केला जात आहे वरून चुरमा टाकून सदर कामावर रोलर न फिरवता व खड्ड्यातील माती न काढता पुढे डांबर टाकून खड्डे बुजवण्यात आले होते सदर रस्त्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना व संबंधित कर्मचारी अधिकारी यांना संपर्क साधला होता तरीही त्यांनी मुजोरपणा करून हे बोगस काम करण्यात आले होते नेमकं कोणी या कामात मलिदा खाल्ला व या बोगस काम करणार्या इंजिनीयर व गुत्तेदाराची पाठराखण केली असाही सवाल उपस्थीत होत आहे कोणी खडी व डांबर खाल्ले कि काय असा प्रश्न ग्रामस्थाकडून उपस्थित केला जात आहे या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये कार खडी असल्यामुळे त्यामध्ये वाहनाचे टायर जाऊन वाहन पंचर होत आहेत बऱ्याच वाहनाचे आतापर्यंत टायर फुटलेले आहेत काही वाहनाचे पाटे तुटले त्यामुळे वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच काही वाहने खड्ड्यात जाऊन पलटी झाली आहेत कोंड व तावरखेडा जाणाऱ्या रस्त्याचा मलिदा नेमका कोणत्या गुत्तेदाराने खाल्ला का अभियंत्यांनी खाल्ला असा सवाल कोंड येथील वाहनधारकाकडून केला जात आहे या मुजोर अशा अधिकाऱ्यावर लवकरच ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे तसेच हे काम सुरू असताना संबंधित ग्रामपंचायतने या कामाची संबंधित विभागाकडे तक्रार केली परंतु या विभागाने ही दुर्लक्ष केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यावर ही गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा सुरू आहे तसेच या रस्त्याच्या सर्व खड्डे बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय न घेतल्यास त्यांच्यावर ही कारवाईची टांगती तलवार दिसत आहे त्यांच्यावरही कार्यवाही होणार आसल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत हे या रस्त्याचे खडी व डांबर खाल्लेल्या संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार असून या रस्त्याबाबत लवकरच ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होणार आहे त्यामुळे गावातील वाहनाची झालेले नुकसान केलेल्या बोगस कामाची चौकशी लवकरच होणार आहे अशी चर्चा सध्या गावात चांगली रंगली आहे तावरजखेडा कोंड हा रस्ता मुरुड जाणार आहे दररोज या रस्त्यावरून मुरुड साठी हजारो वाहने ये-जा करतात त्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बाजार या रस्त्यावरून औसा विभागाच्या जवळपास वीस बसेस फेऱ्या मारतात त्या बसेसही खुळखुळा झाल्याचे दिसत आहे त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात होत आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित काम हे बोगस झाल्याची तक्रार लवरच दाखल होणार आहे त्यामुळे यामध्ये या कामावरील अधिकारी व गुत्तेदार आहे मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊन त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे सदर कामाची कालमर्यादा हि तीन वर्षाची गँरंटी आसते तीन वर्षात बुजवलेले खड्डे उखडल्यावर त्याच गुत्तेदाराने दुरुस्ती करायची असा नियम आहे परंतू या नियमाची एक वर्षाच्या आतच पायमल्ली केली जात आहे