ती ऑडिओ क्लिप” अभियंता बन्नोरे चीच; क्लिप तयार करणाऱ्याचा लेखी दावा – बन्नोरे च्या भ्रष्टाचाराला बळी पडलेले अनेक पीडित आले समोर

चांदुर बाजार:-

स्थानिक विद्युत वितरण विभागाचे शहर अभियंता विपुल बन्नोरे यांनी भ्रष्टाचार करत असताना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपला भ्रष्टाचाराचा पुरावा मागे सोडला आहे. यावरून संबंधित अभियंता त्याविरुद्ध बातम्या प्रसारित झाले आहे एका वृत्तपत्रामध्ये आपला खुलासा देत असतांना या अभियंत्याने असे ऑडिओ क्लिप सी माझा कोणताही संबंध नाही आणि अशी कोणती क्लिप व्हायरल झाली नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु या व्हिडीओ क्लिप च्या बाबतीत ज्या भ्रष्टाचाराचे बळी पडलेल्या एका ग्राहकाने ही ऑडीओ क्लिप तयार केली. व लेखी दावा पत्रकारांसमोर सादर केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी अभियंता विपुल बनवरे यांचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहे.
एवढेच नव्हे तर या अभियंता ने ज्या वीज ग्राहकांचा पैशासाठी मानसिक छळ केला असे अनेक वीज ग्राहक बातमी प्रकाशित झाल्या नंतर समोर येत आहे. या वीज ग्राहकांनी या अभियंत्यांच्या भरस्ताचाराला कसे बळी पडलो याचा लेखी तक्रारी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा स्थानिक शाखेच्या कार्यालयाकडे दिल्या आहेत. या आलेल्या सर्व लेखी तक्रारीवरून अभियंता विपुल बनवरे यांचा भरष्टाचाराचे स्वरूप अधिकच व्यापक असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पत्रकारांवर खोटे आरोप करून स्वतःला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न अभियंता बंनवरे करीत आहे. तसेच आपल्या आरोपात या अभियंत्यांने एक पत्रकाराचा नाव घेऊन खुलासा केला आहे. या खुलासातील सर्व आरोप सांबांधित पत्रकाराने नाकारत या बाबत चे सर्व पुरावे आमच्या स्थानिक प्रतिनीधी कडे सादर केले आहे.
त्याच प्रमाणे पत्रकारावर केलेले सर्व आरोप या भ्रष्टाचारी अभियंत्यांने जाहीर रित्या खुलासेवार सिद्ध करून दाखविण्याचे आवाहन ही या अभियंत्याला केले आहे. तसेच ऑडिओ क्लिप तयार करणाऱ्या वीज ग्राहकाने लेखी दिलेल्या तक्रारी वरून सादर घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रकरण बाबत कार्यकारी अभियंता सुधीर वानखडे याना सुद्धा माहिती देण्यात आली होती असल्याचे सत्य समोर आले आहे. कार्यकरी अभियंता वानखडे यांनी यावर कार्यवाही करण्याचे तोंडी आस्वाशन सुद्धा दिले. मात्र आजवर कोणतीच कार्यवाही केली नसल्याने दोन्ही अधिकाऱ्याची मिलीभागात तर नाही ना? असा प्रश्न या वेळी उपस्थित होते आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।