प्रहार नगरसेवक सचिन खुळे चे अन्नत्याग आंदोलनाला यश; मुख्याधिकारी चे लेखी आस्वाशन; आ. बचू कडूच्या माध्यस्तीने उपोषणाची सांगता

0
785

प्रहार नगरसेवक सचिन खुळे चे अन्नत्याग आंदोलनाला यश;
मुख्याधिकारी चे लेखी आस्वाशन;
आ. बचू कडूच्या माध्यस्तीने उपोषणाची सांगता

चांदूर बाजार -:-प्रतिनिधी

शहरातील नागरिकांचे घराच्या जागेचे सन 1995 पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिले होते. मात्र वर्ष लोटूनही अद्यापपर्यंत शहरातील नागरिकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात आले नाही. यामुळे आज 4 ऑक्टोंबर रोजी प्रहार चे स्वीकृत सदस्य सचिन खुळे यांनी पालिका कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अखेर सायंकाळी 7 वाजता आमदार बचू कडू च्या माध्यस्तीने मुख्याधिकारी नि प्रस्ताव पाठविण्याचा आस्वासणानंतर उपोषणाची सांगता झाली.
सण 1995 पूर्वीचे चांदूरबाजार शहरातील नागरिकांच्या घराच्या जागेचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता स्थानिक प्रहरच्या नगरसेवकांनी शहरातील जयस्तंभ चौक येथे उपोषण केले होते. या उपोषणातील मुख्य मागणी ची दखल घेत 10 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी अमरावती व आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद चांदूरबाजार यांना 1995 पूर्वीच्या शहरातील नागरिकांच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही वर्षलोटून ही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रहरचे स्वीकृत सदस्य सचिन खुळे ,नगरसेवक सरदार खा, शिशिर माकडे, ऋषीकेश खोडपे या कार्यकर्त्यानी नगर पालिकेसमोर उपोषण मांडले होते.
शहरातील सण 1995 पूर्वीचे अतिक्रमण धारकाचा हक्का साठी प्रहार नगरसेवकांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. यावेळी आमदार बचू कडू यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांचा मागण्या जाणून घेतल्या. या वेळी मुख्याधिकारी जितकुमार सेजव उपस्थित होते. आंदोलकांचा मुख्य मागणी वर पालिकेचे मुख्याधिकारी सेजव यांनी तात्काळ हालचाली करून 5 ऑक्टोबर रोजी हा प्रस्ताव पाठविणार असलयाचे लेखी आस्वाशन दिले. आंदोलकांचा मागण्या मंजूर झाल्याने आमदार बचू कडू यांनी आंदोलन कर्त्याना उपोषण मागे घेण्याबाबत संगीतले.
स्थानिक नगर पालिकेवर भाजप ची एक हाती सत्ता असून विरोधी पक्षात असलेले प्रहार च्या नगरसेवकांना हेतूपुरस्पर डावलले जात असल्याचा आरोप ही नगरसेवक सचिन खुळे यांनी केला आहे. यावेळी बाजार समिती चे संचालक मंगेश देशमुख, वसु महाराज, दीपक भोंगाडे, माजी नगराध्यक्ष रहमानभाई, मुझफ्फर हुसैन, गणेश पुरोहित नजीर कुरेशी, बंटी निंभोरकर सह मोठ्या संखेने प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते