न्यायालयांनी धार्मिक श्रद्धांविषयी निर्णय घेतांना धार्मिक परंपरांना लक्षात घ्यावे ! – अरुण जेटली

0
683

नवी देहली – न्यायालयाने धार्मिक श्रद्धांच्या संदर्भात निर्णय घेतांना सर्व धार्मिक परंपरा विचारात घेतल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलतांना व्यक्त केले.

जेटली पुढे म्हणाले, ‘‘जर धार्मिक प्रथा आणि परंपरा यांनाही घटनेच्या अनुच्छेद १४ (समानतेचा अधिकार) नुसार पाहिले जात असेल, तर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’कडेही त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. जर असे केले, तर ते अनेक पत्नी करण्यावर लागू होईल का ? तोंडी तलाकवर ते लागू केले जाईल का ? जेथे महिलांना प्रवेशबंदी आहे, अशा धार्मिक स्थळांनाही अनुच्छेद १४ चा हवाला दिला जाईल का ?’’ जेटली यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगितेला दिलेल्या मान्यतेवरही असहमती दर्शवली. ‘‘अशा गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अनुमती देता येऊ शकत नाही’’, असे ते म्हणाले.