शाकाहारामुळे माझा खेळ सुधारला ! – विराट कोहली

136

नवी देहली – गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे. ‘सध्या प्रोटीन शेक आणि पालेभाज्या हा आहार घेत आहे. शाकाहारामुळे पचनशक्ती वाढली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा अधिक निरोगी वाटत आहे’, असे कोहली यांनी म्हटले आहे.