शिक्षकांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करा – एसएफआय

0
1251
Google search engine
Google search engine

आयटीआय विद्यार्थ्यांच्या वतीने संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

बीड (९) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कमिटी च्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संस्थेतील निदेशक (शिक्षक) यांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करण्याची मागणी यावेळी ‘एसएफआय’ ने केली आहे.

शिक्षकांच्या अतिरिक्त मतदान प्रक्रियेतील कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या कामांमुळे शिक्षकांना तासिका वेळेवर घेण्यास अडचण होत आहे. म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने या प्रश्नासह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी ‘एसएफआय’ने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनातून संस्थेतील शिक्षकांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करा. संस्थेत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आदी सुविधा उपलब्ध करा. ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करा. स्टायपेंडमध्ये महागाईनुसार वाढ करून दरमहा त्याचे वाटप करा. शासकीय तसेच खाजगी संस्थेतील आयटीआय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा. सर्व ट्रेडच्या प्रश्नपत्रिका मराठीतून देण्यात याव्यात. या मागण्या ‘एसएफआय’ ने केल्या आहेत. यावेळी ‘एसएफआय’ राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, संघटनेचे आयटीआय युनिट अध्यक्ष रवि राठोड, जिल्हा कमिटी सदस्य रामेश्वर जाधव, विनोद राठोड, युवराज पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.