आ.बच्चू कडू यांचा आईच्या वाढदिवसानिमित्त ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘..! कृतज्ञ सोहळा : दोनशे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना ठिंबक संच वाटप . राष्ट्रमाता जिजाऊ – सावित्रीबाई फुले निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ

0
1348
Google search engine
Google search engine

आ.बच्चू कडू यांचा आईच्या वाढदिवसानिमित्त ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘..!
कृतज्ञ सोहळा : दोनशे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना ठिंबक संच वाटप .
राष्ट्रमाता जिजाऊ – सावित्रीबाई फुले निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ .
चांदुर बाजार //प्रतिनिधी बादल डकरे

आमदार बच्चू कडू यांच्या आई श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचा वाढदिवस ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘ म्हणून अनेक सामाजिक व शासकीय योजनांचा शुभारंभ करून साजरा केल्या जाणार आहे.या निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ -सावित्रीबाई फुले निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ आमदार बच्चू कडू आपल्या मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या हस्ते याप्रसंगी करणार आहेत.

मूर्तिपूजा करून , ढोलताशे वाजवून दुर्गा उत्सव साजरा केल्यापेक्षा आईच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ – सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत त्यांच्या नावाने निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ करून या योजनेअंतर्गत २०० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना ४२००० रुपये किमतीचे ठिंबक संच वाटप करून ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘ आमदार बच्चू कडू यांनी आयोजित केला आहे .आईने बालपणी दिलेली सेवेची शिकवण व त्या शिकवणीतून निर्माण झालेली आपली सेवावृत्ती याची कृतज्ञ भावना व्यक्त करण्याचा हा सोहळा चांदुर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पूर्णमाय अपंग पुनर्वसन केंद्र येथे दि.११ ऑक्टोबर २०१८ वार गुरुवार रोजी दुपारी २ वाजता आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अभिजित बांगर , विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे , निर इरिगेशन मुंबईचे एम.डि. रमेश घोसार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.तसेच रेणुका फाउंडेशनचे गजानन लोखंडकार , जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे , अचलपूर उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड , चांदुर बाजार उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते , अचलपूर उपविभागीय कृषी अधिकारी गोपाल देशमुख , अचलपूर तहसीलदार निर्भय जैन , चांदुर बाजार तहसीलदार नीलिमा मते , अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल सातव चांदुर बाजार तालुका कृषी अधिकारी शीतल उके आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत .

४०० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००० रुपये वार्षिक मदत , तसेच ५०० दिव्यांग बांधवाना साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात येणार आहे . आमदार बच्चू कडू आपल्या आईच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘एक दिवसाचा दुर्गा उत्सव साजरा करून ‘ सामाजिक सेवेचे एक क्रांतिकारी पाऊल टाकणार आहेत.

..तरच शेवटच्या वंचिताचे अश्रू पुसणे शक्य होईल :- आमदार बच्चू कडू :-
पूसप्रत्येक दुर्गा मंडळाने अश्या पद्धतीने किमान एक गरजू कुटुंबाला मदत केल्यास समाजातील दुःख दूर करण्यास मोठा हातभार लागेल .मृत्यूनंतर आई वडिलांची तेरवी साजरी केल्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभाव जपल्यास , समाजातील शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांचे अश्रू पुसण्याचे पुण्य महान आहे .अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे

आ.बच्चू कडू यांचा आईच्या वाढदिवसानिमित्त ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘..!
कृतज्ञ सोहळा : दोनशे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना ठिंबक संच वाटप .
राष्ट्रमाता जिजाऊ – सावित्रीबाई फुले निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ .
चांदुर बाजार //प्रतिनिधी बादल डकरे

आमदार बच्चू कडू यांच्या आई श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचा वाढदिवस ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘ म्हणून अनेक सामाजिक व शासकीय योजनांचा शुभारंभ करून साजरा केल्या जाणार आहे.या निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ -सावित्रीबाई फुले निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ आमदार बच्चू कडू आपल्या मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या हस्ते याप्रसंगी करणार आहेत.

मूर्तिपूजा करून , ढोलताशे वाजवून दुर्गा उत्सव साजरा केल्यापेक्षा आईच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ – सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत त्यांच्या नावाने निराधार महिला आधार योजनेचा शुभारंभ करून या योजनेअंतर्गत २०० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना ४२००० रुपये किमतीचे ठिंबक संच वाटप करून ‘ एक दिवसाचा दुर्गा उत्सव ‘ आमदार बच्चू कडू यांनी आयोजित केला आहे .आईने बालपणी दिलेली सेवेची शिकवण व त्या शिकवणीतून निर्माण झालेली आपली सेवावृत्ती याची कृतज्ञ भावना व्यक्त करण्याचा हा सोहळा चांदुर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पूर्णमाय अपंग पुनर्वसन केंद्र येथे दि.११ ऑक्टोबर २०१८ वार गुरुवार रोजी दुपारी २ वाजता आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अभिजित बांगर , विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे , निर इरिगेशन मुंबईचे एम.डि. रमेश घोसार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.तसेच रेणुका फाउंडेशनचे गजानन लोखंडकार , जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे , अचलपूर उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड , चांदुर बाजार उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते , अचलपूर उपविभागीय कृषी अधिकारी गोपाल देशमुख , अचलपूर तहसीलदार निर्भय जैन , चांदुर बाजार तहसीलदार नीलिमा मते , अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल सातव चांदुर बाजार तालुका कृषी अधिकारी शीतल उके आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत .

४०० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००० रुपये वार्षिक मदत , तसेच ५०० दिव्यांग बांधवाना साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात येणार आहे . आमदार बच्चू कडू आपल्या आईच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘एक दिवसाचा दुर्गा उत्सव साजरा करून ‘ सामाजिक सेवेचे एक क्रांतिकारी पाऊल टाकणार आहेत.

..तरच शेवटच्या वंचिताचे अश्रू पुसणे शक्य होईल :- आमदार बच्चू कडू :-
पूसप्रत्येक दुर्गा मंडळाने अश्या पद्धतीने किमान एक गरजू कुटुंबाला मदत केल्यास समाजातील दुःख दूर करण्यास मोठा हातभार लागेल .मृत्यूनंतर आई वडिलांची तेरवी साजरी केल्यापेक्षा जिवंतपणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभाव जपल्यास , समाजातील शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांचे अश्रू पुसण्याचे पुण्य महान आहे .अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे .

.