अचलपूर विधानसभा मतदार संघातील रखडलेल्या कामासाठी) नगरसेवक गोपाल तिरमारेचे राहूटीमध्येच अन्नत्याग आंदोलन =>अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला गती केव्हा येणार

0
1161
Google search engine
Google search engine

अचलपूर विधानसभा मतदार संघातील रखडलेल्या कामासाठी)
नगरसेवक गोपाल तिरमारेचे राहूटीमध्येच अन्नत्याग आंदोलन

=>अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला गती केव्हा येणार

तालुका प्रतिनिधी/९ऑक्टो
चांदुर बाजार:अचलपूर मतदार संघातील अत्यंत महत्वाच्या मागण्या संदर्भात अनेक दिवसांपासून संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा करून शासन व प्रशासनाने कोणतीही दखल न घेता अचलपूर मतदार संघातील शेतकऱ्यांचा विकास गेल्या कित्येक वर्षाच्या प्रलंबित कामाने कोसोदूर गेला असतांना त्या कामाला गती येण्याच्या दृष्टीकोनातून चांदुर बाजार नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी अचलपूर मतदार संघातील अत्यंत महत्वाच्या मागण्या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने चांदुर बाजार येथील नेताजी चौकात राहुटी उभारून अन्नत्याग आंदोलनाला ८ऑक्टोबर पासून सुरुवात केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून अचलपूर मतदार संघातील प्रकल्प रखडले असतांना त्या कामांना गती अद्यापही आली नाही .तसेच मतदार संघात बर्येच विकास कामे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे.अमरावती जिल्हयात अचलपूर आणि चांदुर बाजार तालुक्यातील वासनी बु प्रकल्प,भागाडी प्रकल्प,बोर्डी नाला मध्यम प्रकल्प,बोरगाव मोहना प्रकल्प, करजगावं लघु प्रकल्प अशा काही प्रकल्पाचे काम सुरु आहे परंतु सदर काम बऱ्याच काळापासून रखडले असल्याने त्याचा शेतकऱ्यांना अद्याप कुठलाच फायदा झाला नसल्याने त्या रखडलेल्या प्रकल्पाच्या कामास त्वरित सुरुवात करण्यात यावी.तसेच आपल्या मागणीमध्ये नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी चांदुर बाजार येथील ग्रामीण रूग्णालयातील अधिरार्यांची रिक्त पदे भरण्यात यावी औषधसाठा सुद्धा उपलब्ध राहत नाही,चांदुर बाजार शहरामध्ये अनेक वर्षांपासून जुने विद्युत खांब व विद्युत तारा लोम्बकळ्त असल्याने मोठा अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते,समाज कल्याण विभाग अंतर्गत रमाई आवास योजने अंतर्गत गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरात मिळाली नाही,तालुका पशुवैद्यकीय दवाखाना चांदुर बाजार येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे,आमदारांची राहुटी आपल्या गावात २०१८अभियान अंतर्गत १जानेवारी ते ६फेब्रुवारी या काळात किमान १८००चे वर शिधापत्रिकेचे वाटप चांदुर बाजार तहसीलकडून करण्यात आले परंतु वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिका धारकांना अद्यापर्यत स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही,तहसील कार्यालयाकडून नागरिकांना वितरित करण्यात आलेले या शासकीय शिधापत्रिकेवर “आ बच्चू कडू आमदारांची राहुटी आपल्या गावात२०१८”अशा आशयाचा शिक्का नियमांचे उल्लंघन करून मारण्यात आला असल्याने लोकप्रतिनिधींच्या नावाचा शिक्का मारून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,स्वस्त धान्य वितरकाकडून दि १४जून २०१८नंतरही रु ५५ प्रति किलो प्रमाणेच तूरडाळ विक्री करण्यात आल्याने हजारो शिधापत्रक धारक कुटुंबाची आर्थिक पिळवणूक करण्यात आल्याने दोषींवर कार्यवाही करण्यात यावी,पूर्णा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदुर बाजार या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराची या झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी तसेच प्रहार कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित बेलोरा ता चांदुर बाजार या संस्थेकडे थकीत असलेले शासनाचे शासकीय भाग भांडवल व दालमील प्रकल्पाचे थकीत भागभांडवल शासकीय कर्ज व कर्जावरील व्याज असे एकूण ५०लक्ष ६६हजार रुपयाची रक्कम वसुलपात्र असतांना सुद्धा राजकीय दबावापोटी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.करीता उपरोक्त संस्थेमध्ये झालेल्या गैर व्यवहाराकरिता दोषीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी इत्यादी मागणीसाठी नगर सेवक गोपाल तिरमारे यांचेसह गजानन राऊत बेलोरा,सचिन देशमुख चिंचोली यांनी सदर मागण्या पूर्ण होणे संदर्भात कोणतीही उपाययोजना व कार्यवाही न झाल्याने चांदुर बाजार येथील नेताजी चौकामध्ये राहुटी उभारून राहुतीमध्येच ८ऑक्टोबर पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असल्याने या आगळ्यावेगळ्या अन्नत्याग आंदोलन राहुटीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून लक्षवेधी ठरत आहे.