‘गर्जा महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या जितू्च्या ‘बघतोस काय… मुजरा कर!’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

363

 

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र या चित्रपटाचे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय… मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.

 

जितेंद्र जोशी या हरहुन्नरी कलाकाराच्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बघतोस काय… मुजरा कर!’ छत्रपती शिवाजीमहाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही महाराष्ट्राची अभिमानस्थळं. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष जितेंद्र जोशी यांच्या या चित्रपटातून अधोरेखित केलं गेलेलं आहे. नानासाहेब, पांडुरंग आणि शिवराज… या खरबुजेवाडीतल्या मावळ्यांची ही कथा येत्या १४ ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्तानी सोनी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. शिवरायांच्या स्मारकावर होणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग जरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला, तरी हा चित्रपट निर्माण केल्याचं सार्थक होईल आणि महाराष्ट्राचं वैभव उजळून निघेल असं या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात.

 

या चित्रपटातून शिवबांचं गुणगान करणारे जितेंद्र जोशी सध्या सोनी मराठीवर सुरू असणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राची थोर गाथा सांगत आहेत. आत्तापर्यंत या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. तर यापुढील भागात गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर रुखमाबाई राऊत  आणि महाराष्ट्रभूमीवरच्या अशाच थोर व्यक्तींच्या गोष्टी नव्यानी जाणून घेता येणार आहेत. तेव्हा सध्या सुरू असणाऱ्या गर्जा महाराष्ट्र बरोबरच ‘बघतोस काय… मुजरा कर!’ या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमधून जितूच्या वेगवेगळ्या छटा सोनी मराठी वाहिनीवर नक्की पाहत राहा.

 

येत्या १४ ऑक्टोबर ला पाहायला विसरू नका बघतोस काय… मुजरा कर!’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर फक्त सोनी मराठी वर .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।