*मोर्शी येथे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात निषेध मोर्चा >< पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ची दरवाढ करून मोदी सरकार करत आहे जनतेची लूट - श्री विक्रम ठाकरे*

0
745
Google search engine
Google search engine

मोर्शी / अतुल काळे:-

मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस तर्फे दिनांक 11 ऑक्टोबर 2018 रोजी वरुड येथे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विक्रम ठाकरे यांनी उपरोक्त वक्तव्य केले

आज दिनांक 11 ऑक्टोबर 2018 रोजी मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात मोशी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारने 32 रुपयांची भरपूर वाढ करून फक्त 5 रुपये दरवाढ कमी करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे. सत्तेत आल्यावर असे करू तसे करू असे भरपूर आश्वासन या मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. ते आश्वासन पूर्ण तर केलेच नाही, उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ मोठया प्रमाणात केली आहे. सर्वसामान्य जनतेला लॉलीपॉप देऊन सत्तेत येणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून मोर्शो येथे प्रत्येक पेट्रोल-डिझेल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस वा शहर कांग्रेस तालुका कांग्रेस तर्फे लॉलीपॉप देण्यात आला. व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून या बेजबाबदार आणि निष्क्रिय मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी नगरसेवक नितीन उमाळे,नगरसेवक सुरेंद्र परतेकी ,नगरसेवक सागर ठाकरे, नगरसेवक नितिन पन्नासे युवक काँग्रेस शहरअध्यक्ष मोर्शी , नगरसेवक राजू साठवणे, मोरेश्वरभाऊ गुळधे ऊपा अध्यक्ष ख.वि मोर्शी ,संजुभाऊ आखरे संचालक, वसीम अक्रम कुरैशी युवक काँग्रेस जिल्हा महासचिव,विक्रम राऊत मोर्शी विधानसभा ऊप अध्यक्ष,निलेश लायदे महासचिव युवक काँग्रेस मोर्शी विधानसभा,प्रकल्प वानखडे, संजय नागले दापोरी,वासूदेवभाऊ तायवाडे दापोरी,ईसरार भाई,जावेद अली,संजय ठाकरे,कोकरे भाऊ अंबाडा,अजिज भाई अंबाडा,सज्जु भाई अंबाडा,चंदु भाऊ जवंजाळ,शैलेश भुयार .धीरज ठाकरे,योगेश कडू,अक्षय पांडे,कटिस्कर भाऊ .प्रदीप इंगले . सोनु मिजाॅ,सोनू भाई,
. काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.