आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आकोट शाखेचा शस्त्रपूजन व दसरा उत्सव

0
1084
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आकोट शाखेचा आज शस्त्रपूजन विजयादशमी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.आज शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता श्री सरस्वती विद्यालय कॉलेज रोड आकोट येथे हा उत्सव साजरा होणार आहे.

यामहोत्सवासाठी प्रमुख वक्ता माननीय श्री प्रमोद जी बापट (पश्चिम क्षेत्र प्रचारक मुंबई )हे असणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गोपाल सिकवाल (अस्थिरोग तज्ञ आकोट) यांची उपस्थिती लाभणार आहे .

या वार्षिक महोत्सवात सर्व शहरवासीयांनी परिवारासह उपस्थित लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.उत्सवापुर्वी दु. ४ वा.१५ वाजता संघाचे सह घोष पथसंचलन नगरातून मुख्य मार्गाने निघणार आहे.यावेळी नगरातील नागरिकांनी चौकाचौकातून घोष पथक तथा पथसंचलनाचे स्वागत करावे असे आवाहन नगर कार्यवाह नितीन शेगोकार यांनी केले आहे.पाऊस आल्यास हा महोत्सव श्री नरसिंग मंदिर सभागृहामध्ये नियोजित वेळीच होईल असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.