महावितरणद्वारे विजेचे नियोजन: भारनियमन कमीत कमी

0
953

महावितरणद्वारे विजेचे नियोजन: भारनियमन कमीत कमी

मागणी वाढल्याने भारनियमन

चांदुर बाजार:-बादल डकरे

सध्या राज्यात विजेची मागणी 19,500 ते 20,500 मे.वॉ. इतकी असून विजेची उपलब्धता 14,500 ते 15,000 मे.वॉ.इतकी आहे.वातावरणातील बदलांमुळे वाढणारी विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी महावितरणने विजेचे नियोजन करून पॉवर एक्सचेंजमधून दररोज 3,200 मे.वॉ.पर्यंत तर लघुकालीन निविदेद्वारे 1,000 मे.वॉ. पर्यंत वीज खरेदी करण्यात येत आहे.

ज्या ठिकाणी वीजबिलांचा भरणा करण्यात येत नाही अशा जी-1,जी-2 आणि जी-3 वीज वाहिन्यांवर केवळ 400 ते 600 मे.वॉ. विजेचे भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे नवरात्र उत्सव व सणासुदीच्या काळात राज्यात सायं.6.30 ते 12.00 वा.पर्यंत भारनियमन करण्यात येत नाही.अशी माहिती महावितरण कडून मिळाली आहे.