दुधगावात लाईनमची दादागीरी ; दुष्काळग्रस्त गावातील पिण्याचे पाणी केले बंद

0
1343
Google search engine
Google search engine

लाईनमन गुणवंत कसपटे

स्वताला इंजिनीयर समजणारे देवानंद सुरवसे क्लर्क

रामलिंग धाबेकर यांच्या बोअरचे तोडले कनेक्शन

उस्मानाबाद – दुधगाव ता उस्मानाबाद येथे कार्यरथ असलेल्या मुजोर लाईनमन ने गावात पाणी पुरवठा करणाऱ्या शेतातील बोअरचे थ्रिफेज कनेक्शन कट करुन टाकल्याने ग्रामस्थांचे पाण्यामुळे हाल होत आहेत
यावर्षी पाऊसकाळ न झाल्याने सर्वञच भिषण पाणी टंचाई जाणवत आहे दुधगावमध्ये देखिल अशिच भिषण पाणीटंचाई आहे गावात पाणी पुरवठ्या ठोस योजन कार्यरथ नसल्याने ग्रामस्थ गावाच्या शेजारी असलेल्या विहीरी कुपनलिका येथुन पाणी भरतात गावाजवळ असलेल्या रामलिंग धाबेकर यांच्या शेतामधिल कुपनलिकेला गावातील जवळपास निम्मा भाग पाणी भरतो मागील पाणी टंचाईच्या काळात देखिल ही कुपनलिका शासनाने आधिगृहीत करुन गावाला पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे गावातील लोकांची पाणी भरण्यासाठी नेहमीच या कुपनलिकेवर गर्दी असते
शुक्रवारी या गावात कार्यरथ असलेला गुणवंत कसपटे हा लाईनमन गावात आला व त्याने गावातील थकबाकी असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन कट केले यामध्ये रामलिंग धाबेकर यांचे घरचे विज कनेक्शन थकबाकीत होते म्हणुन घरचे कनेक्शन कट केले यानंतर या लाईनमने तुम्ही शेतातुन घरात लाईट घेताल असे म्हणुन रामलिंग धाबेकर यांच्या शेतातील थ्रिफेज कनेशन कट केले यावेळी गावातील उपसरपंच विकास धाबेकर, हर्षल धाबेकर अलम सय्यद, बालाजी धाबेकर, गोकुळ धाबेकर अदी ग्रामस्थांनी मिळुन या कसपटे लाईनमनला विनंती केली की रामलिंग धाबेकर यांचे घरचे कनेक्शन कट करा परंतु शेतातील कनेक्शन कट करु नका कारण संपुर्ण गावाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुपनलिकेवर आहे परंतु मला काय गावाला पाणी मिळो अथवा नमिळो अशी उर्मट भाषा वापरुन ग्रामस्थांशी हुज्जत घालुन लाईनमन कसपटे याने शेतातील कनेक्शन कट करुन घेऊन गेला गावाला पाणीपुरवठा करणारी ही कुपनलिका बंद झाल्याने ग्रामस्था पाण्याच्या शोधात हिंडावे लागणार आहे शहरात मोठ मोठ्या उद्योगधंद्यावाल्याकडे लाखो रुपये थकबाकी असते अनेक लोक चोरुन विज वापरतात विज कंपनी याकडे दुर्लक्ष करते माञ अशा भिषण पाणी टंचाईच्या काळात आकसबुद्धिने संकुचितवृत्तीचे लाईनमने गावचा पाणीपुलवठा बंद पाडतात हे कितपत योग्य आहे अशी चर्चा होत आहे

प्रतिक्रिया
रामलिंग धाबेकर यांच्या घराचे कनेक्शन थकबाकीमुळे कट केले ते योग्य आहे माञ शेतातील कनेक्शन आकसबुध्दीने लाईनमने कट केले आहे याबबत मी गावातीला लोकांना घेऊन लाईनमन कसपटे ला भेटोलो हात जोतजोडून विनंती केली की शेतातील थ्रिफेज कट करु नको निम्मे गाव या बोअरवरुन पाणी भरते माञ याने माझ्याशी देखिल हुज्जत घालुन उर्मट भाषा बोलली

विकास धाबेकर उपसरपंच दुधगाव ता उस्मानाबाद