शंकरराव बोरकरांनी लोकसभेसाठी तुळजा भवानीला घातले साकडे

0
1810
Google search engine
Google search engine

शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे

उस्मानाबाद- सध्या लोकसभेची निवडणुक जवळ येत आहे त्यामुळे शिवसेनेकडुन शंकरराव बोरकरांना उमेदवारी मिळणार आसल्याची सध्या चर्चा सुरु आहे तसेच आज शंकरराव बोरकर यांनी तुळजापूर येथे हजारो शिवसेनेच्या मावळ्यांना सोबत घेऊन आज चौथ्या माळेच्या दिवशी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली तसेच तुळजा भवानी मातेच्या चरणी शेतकरी राजाला चांगले दिवस येवो व आत्ता पडलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीवर शेतकरी राजाला सामोरे जाण्याच बळ देवो हि शंकरराव बोरकर यांनी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना केली. हे खरे आहे परंतू मनात ठेवून लोकसभेची उमेदवारी देखील मिळावी म्हणुन नवसही बोलला आसल्याची चार्चा आहे आई तुळजा भवानीचे दर्शन घेऊन बोरकर यांनी मतदार संघात फेरफटका मारायला सुरवात केली आहे त्यामुळे आता बोरकरांचे पारडे जड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे यावेळी शिवसेनेचे तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,शिवसेनेचे शहरप्रमुख सुधिर कदम,शाम पवार,उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी,बार्शीचे माजी नगरसेवक आब्बास भाई,बोरकर इंग्लिश शाळेचे चेअरमन ललित झिरमीरे,महेश भरणे,भैय्या हिंगमिरे,शिवाजी भोसले आदी