संघावर टिका करण्यापेक्षा संघ शाखेत येऊन प्रत्यक्षात पाहा- प्रमोदजी बापट

0
1012
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

संघावर टिका करण्यापेक्षा संघ शाखेत येऊन प्रत्यक्षात संघाची राष्ट्र सेवा पहा तसेच राष्ट्र प्रथम या भावनेने प्रत्येकाने आपल्या राष्ट्राची सेवा करण्याचा निश्चय केला पाहिजे असे प्रतिपादन मा.प्रमोदजी बापट यांनी अकोट येथे विजया दशमी उत्सवात बोलतांना केले.ते श्री सरस्वती विघालय प्रांगण येथे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा आकोट च्या वतीने आयोजीत शस्त्रपुजन तथा दसरा उत्सवात मुख्य वक्ता म्हणुन बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा.प्रमोद जी बापट (पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख मुंबई) प्रमुख अतिथी डॉ. गोपाल सिकवाल (अस्थी रोग तज्ञ) आकोला विभाग संघचालक मा. नरेन्द्र जी देशपांडे, आकोला जिल्हा सहसंचालक अँड मा. मोहनराव आसरकर, आकोट तालुका संघचालक मा.सुधीरजी महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले प्रत्येकानी आपल्या राष्ट्राची सेवा करण्याचा निश्चय केला पाहिजे, आपल्या दैनंदिन शाखेतून उत्तम शरीर, उत्तम मन,श्थिर निश्चयात्मक आणि सर्व प्रकारी समजुदार,बुद्धी या सर्व गुणांनी युक्त होऊन आपले हे एक आदर्श स्वंयसेवक घडतो. हेच कार्य संघ करीत आहे. विजया दशमी उत्सवात प्रात्यक्षिके दिसून येतात. या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. आपल्या शस्त्राचे पुजन करुन देशसेवेसाठी अहोरात्र आपल्या भारत मातेचे रक्षणासाठी व स्वता:चे रक्षणासाठी शस्त्र चे पूजन करणे गरजेचे आहे. प्रत्येक समाजात राष्ट्राभावना जागृत करण्यासाठी.पू.डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या शुभपर्वावर स्थापना केली. म्हणून विजयादशमी उत्सवानिमित्त संघाचे पथसंचलन, प्रात्यक्षिके, विविध प्रकारच्या कार्यक्रम नागरिकांना समोर दाखविले जातात.संघाचे पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांना संघाचे स्वरूप दिसते. सर्व समाज एकत्र करण्यासाठी संघ काम करतो.हिन्दू समाजाचे संगठन करणे हेच सर्व समस्यांचे अचूक निदान आहे. असे विचार त्यांनी व्यक्त केले.

डॉ. गोपाल सिकवाल यांंनी आपल्या भाषणातून संघाची प्रार्थनेची आठवण झाली ती त्यांनी व्यक्त केली.संघामुळं समाजातील सेवा करण्याची संधी मिळाली असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वगत प्रणाम शस्त्रपूजन, ध्वजारोहण, प्रार्थना, सांघिक गीत ,सांघिक व्यायाम योग, नियुध्द,मनोरे, योगासन, प्रात्यक्षिके आदी करण्यात आली. कार्यक्रम चे प्रास्ताविक व परिचय नगर कार्यवाह नितीन शेगोकर, मुख्यशिक्षक रोशन लावणे, शशांक भावे,साहेबराव तेलगोटे,कुलदिप वैतकार,सुनिल देशमुख, तेजस बोडखे, प्रतिक वानरे विनय जोशी यांनी प्रत्याक्षिके घेतली.

तत्पुर्वी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे, नगराचे पथसंचलन दुपारी ४.३० नगरातून काढण्यात आले. यावेळी चौकाचौकात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक ठीकाणी फुले उधळुन, आतिषबाजी करण्यात आली.