दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरात पोलीसांचा रूट मार्च

0
947
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतीनीधी

शहरात दि. 17 बुधवार रोजी दुर्गा देवीची विसर्जन मिरवणुक निघणार असून विविध ठीकाणांहुन भव्य मिरवणुका निघणार आहेत. यंदा शहरात 74 सार्वजनिक दुर्गा देवी व 13 शारदा देवीची स्थापना झाली असून घटस्थापनेपासुन अकोट शहर वासी हे भक्तिरसात न्हाऊन निघत आहेत, शहरातील प्रमुख देवीच्या मंदिरात भक्तांची विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, ,

आकोटात नवमीला विसर्जन मिरवणुकी ची परंपरा आहे.यावर्षी विसर्जन मिरवणुकीत एकूण 40 च्या वर सार्वजनिक दुर्गा मंडळे सामील होणार आहेत, ह्या मिरवणुका मध्ये हजारो लोक सामील होणार असून महिला वर्गाची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित असणार आहे.यावेळी अकोट शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आज दिनांक 14।10।18 रोजी अकोट शहरात पोलिसां तर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात येऊन, विसर्जन मार्गाने भव्य रूट मार्च काढण्यात आला

,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे नेतृत्वात निघालेल्या या रूट मार्च मध्ये RCP, SRPF , होमगार्ड, पोलीस स्टेशन चे कर्मचारी असे जवळ पास 150 कर्मचारी सहभागी झाले होते तसेच अकोट शहरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक फड, पोलीस उपनिरीक्षक गवई, सोळंके, ग्रामीण चे पोलिस निरीक्षक बहाकार हे सहभागी झाले होते.