अक्षर मानव आकोटचा आदिवासी जीवन परिचय व मेळघाट भ्रमंती उपक्रम संपन्न

0
1468
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके

अक्षर मानव संघटना अकोट शाखा आयोजित दोन दिवसीय आदिवासी जीवन परिचय व मेळघाट जंगल सफारी, किल्ला भ्रमंती उपक्रम उत्साहात पार पडला दिनांक 13 व 14 ऑक्टोंबर असा दोन दिवसाचा उपक्रम अक्षर मानव अकोट शाखेने आयोजित केला होता या उपक्रमाला मुंबई पुणे ठाणे नागपूर परभणी औरंगाबाद अमरावती अकोला सह राज्यभरातून 80 जणांचा सहभाग लाभला

अक्षर मानव आयोजित या उपक्रमाअंतर्गत दिनांक 13 ला आदिवासी चिपी गावात आदिवासी लोकनृत्य तथा जीवन परिचय कार्यक्रम पार पडला यावेळी प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचे भारतातील विविध आदिवासींचा जीवन परिचय घडवणारे सादरीकरण पार पडले

या दरम्यान त्यांनी आदिवासींच्या लोककलांचा परिचय घडणाऱ्या विविध लोककलांचा स्वनिर्मित व्हीडीओ डॉक्युमेंट्रीज दाखवल्यात.तदनंतर संध्याकाळी सर्व आदीवासी बांधवांनी लोकनेत्याचा फेर धरत सहलकर्त्यांचा आनंद द्विगुणीत केला.दि.१३ ला शहानुर जवळ मेळघाट पायथ्याशी मुक्काम करण्यात आला.

त्यानंतर दिनांक 14 ला सकाळी शहानुर जंगलभ्रमंती नरनाळा किल्ला भ्रमंती पार पडली दुपारी १ वा. शांतीवन अमृततिर्थ येथे भोजन घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली उपक्रमाला अक्षर मानव संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

उपक्रमाला लोकजागर मंचच्या अनिल गावंडे ,उन्नती संस्था,सफल फौंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षर मानव संघटनेच्या अकोट शाखेचे संतोष विणके ,शरद सूर्यवंशी, वैशाली इंगळे, शरद झांबरे, जमीर शेख, सुभाष केदार, संतोष लोणकर,गोपाल भांबुरकर, शारदा पर्वतकर ,भुषण पर्वतकर यांच्यासह इतरांनी अथक परिश्रम घेतले.

.विशेष म्हणजे दोन दिवसाच्या या उपक्रमात अक्षर मानव च्या वतीने सहभागी सदस्यांकरिता निवास भोजन चहा नाश्ता वाहतुकीची व्यवस्था निशुल्क करण्यात आली होती.