तुळजा भवानी मंदिरात ड्यूटी करणार्या डाँक्टरांनाही प्रवेशद्वारावर आडवले

0
931

उस्मानाबाद – तुळजापूर येथील मंदिरात कार्यरत असलेल्या डाँक्टरांना आडवल्याचा प्रकार समोर आला आहे सदर पोलिस अधिकाऱ्याला ते वैद्यकीय अधिकारी असुन त्या डाँक्टरांची ड्युटी दर्शन मंडपात आहे असे सांगीतले , त्यांना दिलेली ऑर्डर दाखवली , आय कार्ड दाखवले , त्यांच्या गावाहून आलो आलोय उशीर होतोय कंट्रोल रूमला सही करून ड्युटीवर रुजू होण्याचे आहे , सर्व गोष्टी सांगुनही त्यांनी सोडलेच नाही . तसे पाहता याच दरवाजाने यांचेच सहकारी वा इतर ये जा करत होते मात्र यांनी जाणीव पुर्वक सोडले नाही . मंदिरात काम करताना एका ऑन ड्युटी वैद्यकिय अधिकाऱ्याला असे होत असेल तर बाकी आरोग्य कर्मचाऱ्यांना कशी वागणूक मिळत असेल … मंदीरात दर्शन सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळत नाही पण यांच्या दमदाटीने यांचे परिवार दर्शन घेताना दिसतात .. अगदी कंट्रोल रुम जवळ असताना ड्युटी वर उशीर झाला पुन्हा बाहेरून गर्दीतुन जावे लागले . याला कोणी जाब विचारणारे आहे का ? आरोग्य विभागाला खरच सेवा करतोय का सजा भोगतोय हेच समजत नाही . शेवटी एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याचा मान ठेवून सहकार्याने जनसेवा , आपले कर्तव्य बजावणे गरजेचे असते . मात्र या मनमानी करणाऱ्या अधिका -याला कोण सांगेल का ? .. हा समस्त आरोग्य विभाग कर्मचारी वर्गाचा आपमान होत असून याकडे वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे