बेंबळी पोलिसांनी मनोरुग्णाला दिले जिवादान

0
993
Google search engine
Google search engine

बेंबळी पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शनउस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आज (दि१८) एका मनोरुग्ण व्यक्तीची सेवा केली त्यास माणसात आणण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे माणुसकीचे दर्शन घडविले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेंबळी पोलीस ठाण्या अंतर्गत पाडोळी (आ) दुरक्षेत्रात कर्तव्य बजावणारे बिट अंमलदार श्री एच. एस. चव्हाण, श्री व्ही. आर.पेठे आणि श्री.वाघमारे बी.यु. यांना पाडोळी(आ) गावच्या शिवारात एक एक मनोरुग फिरत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्या मनोरुग्ण व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्याची दाढी ,डोक्याचे केस, हाताचे नखे, वाढलेले, त्याच्या अंगावर अंग भरून कपडे ही नव्हती,त्याला भुकेजलेल्या अवस्थेत पाहून त्याला पाडोळी येथील पोलीस कार्यालयात आणले आणि बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव्ह्या कडे नेहून कटिंग दाढी करून, वाढलेले नखे काढून अंघोळ घातली, पोटभर जेवण दिले आणि नंतर गावातील काही लोकांना बोलावून ओळख पटवली . तेव्हा या व्यक्ती पाडोळी येथील शिवाजी नरहरी गुंड (वय४०) असल्याचे समजले आणि यांचे आई वडील मयत असल्याचे आणि पत्नी असल्याचे समजले.तेव्हा पत्नीला बोलावून दोन्ही नवरा बायकोना साडी परकर आणि त्याला एक ड्रेस आणि त्यांना काही औषध उपचारासाठी आर्थिक मद्दत ही केली,आणि गुंड या मनोरुग्ण व्यक्तीस माणसात आण्याचा प्रयत्न केला.त्यामुळेविजयादशमी या सणाच्या शुभ मुहूर्तावर बेंबळी पोलिसांनी एका मनोरुग्ण व्यक्तीची आणि त्यांच्या पत्नीची सेवा केल्यामुळे आणि जगासमोर माणुसकीचे दर्शन घडविले असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि आभार मानले जात आहेत.