बदली रद्द करण्यासाठी कोंढव्यात शिवसेनेचा भव्य मोर्चा

0
877
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी, पुणे
 मा. आ.महादेव बाबर , चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यावर पी आय मिलिंद गायकवाड यांची बदली रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता.
   कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची आणि त्यांच्यासह इतर चार पोलीस अधिकाऱ्यांची प्रशासकीय बाब म्हणून पाच दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी बदली करण्यात आली होती. परंतु स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे बदली झाली असल्याचे काही राजकीय पक्षाचे म्हणणे आहे .
     यावेळी बोलताना  महादेव बाबर म्हणाले की, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आमदारावर गुन्हा दाखल केल्यानेच त्यांची बदली झाली आहे तसेच आमदार व त्यांचे बंधू सह आणखी एकावर गुन्हे दाखल असताना त्यांना अटक केली जात नाही. भविष्यात त्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.
   यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी निवेदन स्वीकारले .
 याप्रसंगी मा.आ. चंद्रकात मोकाटे, नगरसेविका संगीताताई ठोसर, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, भरत चौधरी, अजय भोसले, गंगांधर बधे, प्रशांत बधे,  प्रसाद बाबर, गणेश कामठे, मारुती ननावरे, ज्ञानेश्वर भोईटे, अमोल हरपळे, महिला आघाडी प्रमुख सारिका भाडळे, स्मिता बाबर, वैशाली बाबर, शकुंतलाताई चौधरी, अमिना भाभी आणि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.